गिरणी कामगारांच्या घरांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या सोडत

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगारांच्या 3 हजार 894 घरांची संगणकीय सोडत रविवारी (ता.1) सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात ही सोडत काढण्यात येईल
MHADA Lottery for Workers Housing tomorrow at the Hands of Uddhav Thackeray
MHADA Lottery for Workers Housing tomorrow at the Hands of Uddhav Thackeray

मुंबई  : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगारांच्या 3 हजार 894 घरांची संगणकीय सोडत रविवारी (ता.1) सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात ही सोडत काढण्यात येईल.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याच्या धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पातंर्गत 720 सदनिका बांधल्या आहेत. तसेच बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल) येथे 2 हजार 630 सदनिका आणि लोअर परेल येथील श्रीनिवास मिलच्या जागी 544 सदनिका बांधण्यात आल्या आहेत. अशा एकूण 3 हजार 894 घरांची सोडत रविवारी काढण्यात येणार आहे. 

शहरातील उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील 225 चौरस फुटांच्या वन बीएचके स्वरूपातील सदनिका अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आहेत. तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पाच्या आवारात 15मजल्यांचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॉवर ) उभारण्यात आले आहे. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब आदी मान्यवर सोडत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com