भाजपला यश मिळण्यामागे यंत्राचा चमत्कार: आमदार डॉ. सतीश पाटील

..
dr-satish-patil.
dr-satish-patil.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट आली होती. या लाटेत अनेक दिग्गज नेते भुईसपाट झाले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते पारोळ्याचे आमदार डॉ. सतीश पाटील विजयी झाले. संदीप काळे यांनी सकाळ माध्यम समूहाच्या "महाराष्ट्र दौऱ्यात" यांची प्रश्न- उत्तर स्वरूपात घेतलेली ही विशेष मुलाखत  

मोदी लाट असुनही तुम्ही जिंकलात कसे?

माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ग्रांमपचायत पासून झाली. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना जनतेशी सतत संपर्कात राहून त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलो. त्यामुळे भाजप पक्षाची सत्ता असताना मला मंत्री पदाची ऑफर दिली होती, पण तुमच्या सारख्या तरुणाची आम्हाला गरज आहे. एक नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असे, शरद पवार म्हणाले. त्यामुळे पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवुन मी कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली.

तुम्ही कुठली कामे प्रामुख्याने केली?

तालुक्यातील 66 गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गिरणा धरण भरलेलं असुनही त्याचा काही फायदा होत नव्हता. मला नदीजोड प्रकल्पाची कल्पना सुचली. गिरणा ते बोरी 70 कि. मी प्रवाहाचा नदीजोड प्रकल्प राबवला. संपुर्ण तालुका दुष्काळमुक्त केला त्यामुळे शेतकरी सुफलाम-सुजलाम झाला.

मोदी लाटेची भीती वाटते का?

मला मोदी लाटेची भीती वाटत नाही. कारण गरीब, कामगार, शेतकरी यांचा मी सेवक आहे. तसेच मी कोणतेही अवैध काम केले नाही त्यामुळे ईडी आदी यंत्रणांची भीती वाटत नाही.

भाजपला यश का मिळले?

मतदार सांगतात की, आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मत दिले तरी उमेदवार निवडून येत नाही. मला वाटतं की, भाजपला यश मिळण्यामागे यंत्राचा चमत्कार आहे. आमच्याकडे ठोस पुरावे नाहीत त्यामुळे आम्ही हे सिद्ध करु शकत नाही.

 पक्षावर निष्ठेला किती महत्त्व?

ज्यांना जिथून मार्ग मिळतो, त्यांनी तिथून  निसटून जावे, ही आज निष्ठेची व्याख्या बनली आहे. पण निष्ठेला खुप महत्त्व आहे. आपन एका विशिष्ठ विचारधारेतून घडत असतो. त्यामुळे विचारधारेशी प्रमाणिक राहणे महत्त्वाचे आहे.

5 वर्षात सरकारने काय केल?

शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवले नाहीत, शेतकरी आजही मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. त्यामुळे ही फसवी कर्जमाफी केली आहे. पाच वर्षात जळगाव जिल्ह्याचे 4 पालकमंत्री झाले, एकानेही विकास केला नाही, फक्त जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com