वडापाव, पाणी बाटलीसाठी गुन्हा दाखल करणारे पोलिस पूजा चव्हाण प्रकरणात गप्प का....

कोरोनाच्या काळात ज्यांनी आपले वडील, आई, भाऊ, बहिण गमावले. या प्रत्येकाला श्रध्दांजी वाहून काहीही मिळणार नाही. त्याच वेळी बेड, ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली असती तर हे अपयश आले नसते.
Why are the police silent in the case of Pooja Chavan who filed a case for Vadapav, water bottle says Gopichand Padalkar
Why are the police silent in the case of Pooja Chavan who filed a case for Vadapav, water bottle says Gopichand Padalkar

सातारा : वडापाव व पाण्याची बाटली घेतली म्हणून खंडणीचा गुन्हा पोलिस दाखल करत असतील तर पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांना सुमोटो गुन्हा दाखल करावासा का वाटला नाही, असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला. 

विधान परिषदेच्या अधिवेशनात आज गोपीचंद पडळकर यांनी  राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका केली. तसेच त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांनी का तत्परता दाखवली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील पोलिसांच्या भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले, गजा मारणे याच्या वाहनांच्या ताफ्यावर पोलिसांनी कारवाई केली.

पण वडापाव व पाण्याची बाटली घेतली म्हणून खंडणीचा गुन्हा दाखल केला. तर जेजूरीच्या देवस्थान ट्रस्टचा कार्यक्रमाला गेलो तेथेही पोलिसांना गुन्हा दाखल करायला लावला. पण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सुमोटो गुन्हा दाखल करावा असे पोलिसांना का वाटले नाही. उपमुख्यमंत्री आपल्या एका भगिनीचा मृत्यू होतोय, पोलिस काहीच करत नाही.

पुणे ग्रामीणचे अधिकारी कोणाच्या सूचनेनुसार गुन्हे दाखल करत आहेत. त्यांना दुसऱ्याचे ऐकायचे असेल तर त्यांनी घरी जाऊन गुरे राखावीत, मग खुशाल कुणाचे एकायचे ते एकावे, असा टोलाही त्यांनी लगावला.पडळकर म्हणाले, सध्या सभागृहात केंद्रावर टीका करण्याचा उद्योग सुरू आहे. केंद्राने कोरोनाच्या काळात पीपीई किट, व्हेंटीलेटर दिले, महिलांना उज्वला गॅस दिल. डाळ, गहू, तांदूळ घरपोच दिले.

इतके सगळे देऊनही राज्य सरकारने काय दिले ते सांगावे. कोरोनाचा संसर्ग वाढला त्यावेळी बेड उपलब्ध होत नव्हते. कोरोनाच्या काळात ज्यांनी आपले वडील, आई, भाऊ, बहिण गमावले. या प्रत्येकाला श्रध्दांजी वाहून काहीही मिळणार नाही. त्याच वेळी बेड, ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली असती तर हे अपयश आले नसते. कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्यांना ५० लाखांचा विमा देण्याची घोषणा केली. पण राज्य सरकारने ऐनवेळी कायदा बदलला. कोविड विलगीकरण कक्षात महिलांवर अत्याचार झाले त्यांच्यावर का कारवाई केली नाही, असा संतप्त सवाल श्री. पडळकर यांनी उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com