ठाकरे म्हणाले, "फडणवीसांना ऐकलं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षांपूर्वी दिसली असती !

सध्या राजकारणाची पातळी खूप खाली चालली आहे. किती तरुण राजकारणात उतरतील माहिती नाही
Aditya Thackeray
Aditya Thackeraysarkarnama

मुंबई : नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी भाजप नेत्याना टोमणा लगावला.

नार्वेकरांचे अभिनंदन करताना ठाकरे म्हणाले, "आपण या महत्वाच्या ठिकाणी बसलेले आहात. तुमच्याकडून तरुणांना आशा आहे, सध्या राजकारणाची पातळी खूप खालावली आहे. आत्ता जे काही घडतंय त्यामुळे किती तरुण राजकारणात उतरतील माहिती नाही,"

माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की आपण एकत्र काम केलं आहे. कसं घडलं, काय घडलं, हे मला माहिती नाही. पण तुम्ही फक्त माझ्या कानात सांगितलं असतं की, अजित, जरा उद्धवजींना सांग आता अडीच वर्षे झालीत. तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, असं चिमचा अजितदादांनी काढला.

Aditya Thackeray
धनंजय मुंडेंचा गोंधळ ; राहुल नार्वेकरांच्या ऐवजी घेतले शिवसेनेच्या नेत्याचे नाव

त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही फडणवीस साहेबांच्या कानात सांगितल होते, त्यांनी ते ऐकलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती , ही परिस्थिती अडीच वर्षांपूर्वी दिसली असती,"

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इकडे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार आहेत. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण हे किती दिवस चालणार? आज हे सर्वजण नैतिकतेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com