Abu Azmi : ...अन् अबू आझमींनी मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनात फाडला 'हा' अध्यादेश

Muslim Reservation In Maharashtra : मुस्लिम आरक्षणाबाबत रणनीती ठरवणार असून, लढा सुरूच राहणार
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama

Maharashtra Political News : मराठा समाजाला विशेष अधिवेशनात एसईबीसी प्रवर्गातून १० टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले. यापूर्वीही राज्यात मराठा समाजासह मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले होते. आता मराठा समाजाचा स्वतंत्र आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राज्यातील मुस्लिम समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाचे काय, असा प्रश्न समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उपस्थित केला. तसेच मुस्लिम आरक्षणासाठी (Muslim Reservation) विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलनही केले.

अबू आझमी (Abu Azmi) यांनी एका ट्विटद्वारे मराठा समाजाला आरक्षण दिले, आता महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षणासाठी विधेयक आणावे, अशी मागणी करत होतात, आरक्षणाच्या मागणीचे फलक घेतलेले दोन फोटो शेअर केले आहेत, तर दुसऱ्या ट्विटमधून त्यांनी सरकारवर निशाणाही साधला आहे. ते म्हणाले, आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचे (Maratha Reservation) स्वागत करतो, परंतु मुस्लिमांना मूर्ख बनवून त्यांच्यावर अन्याय केला गेला आहे, असा आरोपही आझमी यांनी केला आहे.

Abu Azmi
Parth Pawar : शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांचा 'पंच'; पार्थ पवारांच्या 'खासदारकी'साठी ठरणार 'लकी'!

दरम्यान, सरकारने 2014 मध्ये विधानसभेत मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश आणला होता. त्यानुसार समाजाला आरक्षण मिळालेले नाही. यामुळे चिडलेल्या अबू आझमी यांनी तो अध्यादेश फाडून सरकारचा निषेधही केला. तसेच मुस्लिम आरक्षणाबाबत आम्ही भविष्यातील रणनीती ठरवणार असून, या मागणीसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे, असा इशाराही आझमींनी दिला आहे.

राज्यात मुस्लिमांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर आयोग (2006) आणि न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा समिती (2004) यांच्या माध्यमातून मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध केलेले आहे. दरम्यान, 2009 मध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने रेहमान समितीची स्थापना केली होती. त्या समितीने मुस्लिम समाजासाठी नोकऱ्या आणि शिक्षणात आठ टक्के आरक्षणाची शिफारस केलेली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Abu Azmi
Maratha Reservation Vishesh Adhiveshan : मराठा आरक्षणाचा गुलाल उधळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com