Aditya Thackeray
Aditya Thackeray

ठाकरेंनी विरोधकांना सुनावले, 'घाबरत नाही आम्ही, लढत राहू'

Mahavikas Aghadi| Aditya Thackeray| विरोधकांना उठसूट आरोप करण्याची सवय

मुंबई : महाराष्ट्रात किंवा ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही अशा ठिकाणी घाबरवणे, धमकावणे, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर, असा घटनाक्रम सुरु आहे. पण महाराष्ट्र झुकणार नाही, आम्ही लढा देत राहू, असा निर्धार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

विधीमंडळाच्या अर्थसंंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी (२५ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात भाषण केलं, त्यातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा होता. देशाची परिस्थिती काय आहे, कशी अघोषित आणीबाणी आहे आणि महाराष्ट्रात जे काम करत आहोत. यावर एकदम परखड आणि स्पष्टपणे आज बोलले'', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे उत्तर दिले आहे.

Aditya Thackeray
Uddhav Thackeray : हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका.. माझ्या शिवसैनिकाला छळू नका!

विरोधकांना उठसूट आरोप करण्याची सवयच लागली आहे.पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांची आज चिरफाडच केली. जे काही रेकॉर्डवर आहे ते सर्व त्यांनी मांडले. आज राज्यातली जनता आमच्यासोबत आहे. आम्ही काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू. लढा देत राहू व सत्यासोबत राहू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत शुक्रवारी (२५ मार्च) जोरदार भाषण करत भाजपला आव्हान दिले. मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा. शिखंडीसारखे वार का करत आहात? माझ्या कुटुंबावर कारवाई केली म्हणून मी घाबरलेलो नाही. पण हे खेळ थांबवा. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहात बोलताना त्यांनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले. नवाब मलिक हे दाऊदचे हस्तक आहेत, हे केंद्रातल्या यंत्रणांना माहीत नाही का? दाऊदची माणसे कोण हे तरी शोधा. एजन्सी म्हणजे बाण आहेत. भाजप म्हणतील त्या लक्ष्यावर ते वार करतात. याला ठोकायचं, त्याला ठोकायचं, असे चालले आहे. माहिती देणारे तुम्ही, चौकशी करणारे तुम्हीच, सर्व यंत्रणा अशा राबवणारेही तुम्हीच आहात. ईडी आहे की घरगडी, हेच कळत नाही. खरे तर फडणवीस यांना केंद्राने राॅ, सीबीआय अशा संस्थांत कामाल घ्यायला हवे, असा टोमणा त्यांनी मारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com