पद्म पुरस्कारानंतर सुलोचना दीदी म्हणतात...

मुंबईतील (Mumbai) एका चाळीत त्यांचे बालपण गेले. सुलोचना दीदींना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी गायनाला सुरुवात केली.
Sulochna Chavan
Sulochna Chavan

मुंबई: 'हा माझा नसून महाराष्ट्राच्या लोकसंगीताला मिळालेला पुरस्कार आहे. हा माझा सन्मान नसून लावणीचा सन्मान आहे. या वेळी माझे पती असायला हवे होते अशी भावना लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांनी व्यक्त केली आहे. सुलोचना चव्हाण म्हणजेच सुलोचना दीदी यांना पद्म पुरस्काराने (Padma Award) गौरवण्यात आलं. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांचे डोळेही पाणावले होते.

''आज माझे पती शामराव चव्हाण असायला हवे होते ते असते तर मला खूपच आनंद झाला असता. मला लावणीचे जे काही ज्ञान ते माझ्या पतीमुळे. माझ्या लावणीचे खरे संगीतकार हे माझे पती आहेत. त्यांचेच आशीर्वाद मला लाभलेत. मला चांगलं गाता येत नव्हतं पण माझ्या पतींनी माझ्याकडून ते करुन घेतलं. या क्षणी मला त्यांची खूप आठवण येतेय." अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sulochna Chavan
`एमआयएम`च्या तंत्रापुढे हतबल काँग्रेस मालेगावमध्ये खल्लास!

कोण आहेत सुलोचना चव्हाण?

सुलोचना चव्हाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका आहेत. मुंबईमध्ये 17 मार्च 1933 रोजी सुलोचना दीदींचा जन्म झाला. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. सुलोचना दीदींना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी गायनाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळी कलाकारांचे मेळे असायचे सुलोचनादीदींच्या घरचाच 'श्रीकृष्ण बाळमेळा'नावाचा एक मेळा होता. या बाळ मेळ्याच्या माध्यमातूनच सुलोचना दीदींना यांनी कलाक्षेत्रात पाऊल ठेवले.

गायनाच्या क्षेत्रात त्यांनी अमूल्य असे योगदान दिले. भारतातील विविध भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेल्या लावण्या आजही महाराष्ट्रात आवडीने ऐकल्या जातात. आचार्य अत्रे यांच्याकडून त्यांना 'लावणीसम्राज्ञी' असा किताब मिळाला.

सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या प्रसिद्ध लावण्या

मला हो म्हणत्यात लवंगी मिरची

तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं

पाडाला पिकलाय आंबा

मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा

कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?

फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com