अमित शहा मातोश्रीवर जाणार की नाही ? 

अमित शहा मातोश्रीवर जाणार की नाही ? 

मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे मुंबईत विमानतळावर दाखल झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. शहा हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा असली तरी त्यांच्या भेटीविषयी आता शंकाही उपस्थित केल्या जात आहे. 

शहा-उद्धव यांच्या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने आज भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. चार वर्षानंतर मातोश्री आठवली का ? असा प्रश्‍नही भाजपला करण्यात आला आहे. 

विमानतळावर येताच शहा बांद्रयाच्या रंगशारदा हॉटेलमध्ये रवाना झाले. तिथे भाजपची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर ते मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जातील. काही दिवसापूर्वी शेलार यांच्या मातोश्रीचे निधन झाले आहे. शेलार यांचे सांत्वन केल्यानंतर शहा हे ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com