राज्यातील 9 मंत्र्यांचे मी उदाहरण देतो, तुम्ही कारवाई करा! आशिष शेलारांचे आव्हान

दाऊदच्या बहिणीशी आर्थिक संबंध असलेल्या व्यक्तीसोबत राज्यातले मंत्री व्यवहार करतात.
Ashish Shelar
Ashish Shelarsarkarnama

मुंबई : शपथ घेतल्यानंतर राज्यातले मंत्री करतात काय असा सवाल उपस्थित होतो. मी नऊ मंत्र्यांचे उदाहरण देतो त्यांच्यावर कारवाई करावी. आज राज्यासमोर विचित्र चित्र उभे आहे. एक गुन्हा नोंदवायला करुणा नावाची महिला जाते तिला अडकवले जाते, अशी घणाघाती टीका भाजपचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये आशिष शेलार बोलत होते. या वेळी शेलार म्हणाले, परिवहन मंत्र्याने मुंबई म्हाडाच्या जागेवर अनाधिकृत बांधकाम केले ते तोडण्यात आले. त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल त्यांनी केला. प्रोटेक्ट टू क्राईम आणि प्रोटेक्ट टू टेररीझम अशी सरकारची भूमिका आहे. याकूबला फाशी देण्याची गरज नाही म्हणणारे अस्लम शेख या सरकारमध्ये मंत्री आहे. दाऊदच्या बहिणीच्या फ्रंटमॅनसोबत एका मंत्र्याने व्यवहार कवडीमोल भावात केला. शर्जील उस्मानी पुण्यात येतोय काय आणि कार्यक्रम करुन जातो काय? गृहमंत्री हलत नाही आणि पोलिस हलत नाहीत. त्याला कार्यक्रमाची परवानगी याच सरकारच्या काळात मिळाली, असा आरोप शेलार यांनी केला.

Ashish Shelar
अंदाज खरा ठरला! काँग्रेस फडणवीसांच्या मनधरणीला जाणार..

अराजकता निर्माण करणाऱ्यांना समर्थन सरकार देते. किरीट सोमय्या यांना थांबवले आणि कराडला ताब्यात घेतले. चोर पोलिस खेळ आपण बघितला पण राज्यात पोलिस पोलिस खेळ सुरु आहे. राज्यात दलालांची गँग सुपर पोलिस म्हणून काम करते, असेही शेलार म्हणाले. सीबीआयला महाराष्ट्रात नो एंट्री आहे. त्यांना २० वर्षापूर्वीचा दाखला देवून नामोहरम केले जाते. ड्रग डीलच्या कामात असलेल्या लोकांचा सार्वजनिक पंचनामा केला जातो, अशी टीका शेलार यांनी केली.

सपोर्ट ऑफ क्रीमीनल, सपोर्ट ऑफ टेररीस्ट, सपोर्ट ऑफ सेपरेटीस्ट हा सरकारचा कार्यक्रम आहे. आमच्या हिंदुसमाजावर ज्याप्रमाणे आक्रमण होते ते सर्वासमोर मांडले पाहिजे. पालघरला साधूंना ठेचून मारले. लालबागचा राजा गजाआड गेला. वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यावर बंदी. सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील कार्यक्रमाला संजय राऊत जातात. अमरावती आणि मालेगावच्या रझा अकादमीच्या लोकांचे समर्थन होते. चीन आणि पाकिस्तान समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी ताकदीने उभे राहतात. विरोधी पक्षनतेने देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या विरोधात षडयंत्र रचले असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

Ashish Shelar
विमानाने उड्डाण भरताच प्रवाशाचा रक्तदाब वाढला, डाॅ.कराडांनी केले जागेवरच उपचार

भाजपला कार्यकारणीत राजकारणाचे गुन्हेगारीचा प्रस्ताव मांडावा लागला. ज्यांनी जनतेला सुरक्षा द्यायची शपथ घेतली ते आज गुन्हा करत आहेत. नगरमध्ये एका मंत्र्यांचा पीए आत्महत्या करतो. त्यावर व्हिडिओ देखील करतो. मात्र तो मंत्री मंत्रिमंडळात बसला आहे. बीडमधला एक मंत्री ऊधळ माथ्याने फिरत आहे. म्हाडाच्या जागेत अनधिकृत बांधकाम केलेले मंत्री देखील या मंत्रिमंडळात आहेत. ठाकरे सरकार आणि त्यांचे मंत्री गुन्हेगारीचे समर्थक आहेत, असे आरोप शेलार यांनी केले. स्वतः गुन्हे करणारे जर मंत्रीपदावर बसले असेल तर समर्थक गुन्हे गाराचे मंत्री आहेत, असे म्हणावे लागेल. 93 च्या ब्लास्टमधील याकूब मेमनची फाशी वाचवा ही भूमिका घेणारे मंत्री देखील ठाकरे सरकारमध्ये आहेत. दाऊदच्या बहिणीशी आर्थिक संबंध असलेल्या व्यक्तीसोबत राज्यातले मंत्री व्यवहार करतात. आता आतंकवाद्याचे समर्थक ठाकरे सरकार बनले आहे, असे शेलार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com