Rahul Narwekar : राहुल नार्वेकर 'सेंट जॉर्ज'च्या कारभारावर संतापले; डॉक्टरांचे निलंबन करत चौकशीचा आदेश

ST George Hospital of Mumbai Corporation : मुंबई पालिकेच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या गलथान कारभारावर विधानसभा अध्यक्ष तथा आमदार राहुल नार्वेकर चांगलेच संतापले आहेत. कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा डॉक्टरांचे निलंबन केले असून, चौकशी समिती स्थापन केली आहे.
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई पालिकेच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या गलथान कारभारावर विधानसभा अध्यक्ष तथा आमदार राहुल नार्वेकर चांगलेच संतापले आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील 32 वर्षीय कर्मचाऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे.

यावरून तेथील दोन डॉक्टरांना निलंबित करत चौकशी समिती स्थापन केली आहे. राहुल नार्वेकर यांनी स्वतः लक्ष घातल्याने रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.

मुंबई (Mumbai) पालिकेच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील 32 वर्षीय अनिश कैलास चौहान हा कर्मचारी घरी जेवायला गेला होता. त्यावेळी त्याला आकडी आली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातून रक्तस्त्राव झाला. त्याला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याची जखम जबर होती. त्याला टाके घालण्याची आवश्यकता होती. परंतु वरिष्ठ डॉक्टर नसल्याने त्याच्यावर उपचारासाठी दिरंगाई झाली. अनिश याच्या जखमेवर तब्बल अडीच तासानंतर आलेल्या डॉक्टरांनी टाके घातले. मात्र अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती ढासळली. अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.

Rahul Narwekar
Crime of Bribery : मुंबई प्रामाणिक, तर नाशिक, पुणे, संभाजीनगर लाचखोरीत अव्वल!

उपचारासाठी दिरंगाई झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. उपचारासाठी दिंरगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. अनिश हा गेल्या सहा महिन्यापूर्वी सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी लागला होता. चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता. या सर्व घटनेची दखल विधानसभा अध्यक्ष आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दखल घेतली आहे. त्यांनी रुग्णालयाला भेट देत चौकशीचा आदेश दिला आहे. तसेच उपाचारात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Rahul Narwekar
MNS News : 'जातीला पोट असतं पण...', बाळा नांदगावकरांनी पुन्हा एकदा मनसेची आरक्षणाबाबतची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले...

राहुल नार्वेकर यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयातील सात ते आठ वर्षे बदली न झालेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच दखल घेतली आहे. अशा अधिकाऱ्यांची बदली करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच अनिशच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या चौकशीसाठी ही समिती स्थापन असेल. घटनेतील पुराव्यांशी छेडछाड नको म्हणून, संबंधित दोघा डॉक्टरांना तात्पुरते निलंबित करण्यात आल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com