बच्चू कडूंना आता सहन होईना :`असं वाटतं हितचं काहीतरी करावं!`

Bacchu Kadu|Vidarbha News| पावसाळी अधिवेशनात बोलताना बच्चू कडूंनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथांकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.
Bacchu Kadu|
Bacchu Kadu|

मुंबई: ''अतिवृष्टीमुळे जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचं घर कोसळतं तेव्हा सरकार त्याला अनुदान फक्त पाच हजारांच देतं. पण जेव्हा त्याचं घर कोसळतं ना त्याच्याकडे काहीच राहत नाही. मीठा-पीठापासून त्यांच्याकडचं सगळ संपलेलं असतं. घरात पाच-सहा माणसं असताना तुम्ही सानुग्रह अनुदान फक्त पाच-सहा हजार देता. लाज वाटते कधी कधी, असं वाटतं इथचं काहीतरी करुन टाकावं.'' अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारी धोरणांवर आसूड ओढला आहे. (Bachu Kadu Latest news)

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते. विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे त्यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं. '' तुमच्या पाच हजारांनी काय होतं. जेव्हा घर कोसळतं, सगळ संपलेलं असतं तेव्हा काय होतं तुमच्या पाच हजारात, अतिवृष्टीमुळे नदी नाल्यात वाहून जाणाऱ्यांपेक्षा घर कोसळून जास्त मृत्यूमुखी पडले. भिंत अंगावर पडून सगळं कुटुंब मृत्यूमुखी पडलं. पण आम्हाला साधा घाम फुटत नाही, लाज नाही वाटतं याची? इंदिरा गांधी आवास योजना आली, पंतप्रधान आवास योजना आली, मग खरा लाभार्थी गेला कुठं, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

Bacchu Kadu|
Breaking ! उपमुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयची छापेमारी

अतिवृष्टीमुळे जेवढं नुकसान होतं त्यापेक्षा तुमच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. चार महिने पाऊस पडून निघून जातो पण तुम्ही आखलेली धोरण शेतकऱ्यांना आत्महत्येपर्यंत घेऊन जातात. याची खऱ्या अर्थाने तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी बच्चु कडू यांनी केली आहे.

''आज इकडचे लोक तिकडे गेले, तिकडचे लोक इकडे आले म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न बदलले असे होत नाही. आजही प्रश्न तेच आहेत, सत्ता बददली म्हणून बोलणाऱ्यांचे चेहरे बदलून जातात. कॉंग्रेस सत्तेत असताना त्यांनी स्वामीनाथन आयोग आणला, आम्ही स्वामीनाथन आयोग स्विकारला, पण तो रुजू केला नाही. या आयोगाच्या शिफारसी लागू केल्या असत्या तर आज पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या असत्या.

त्यानंतर बीजेपी सरकार आले, त्यांनी तर हातच वर केले. पण जे शेतकरी शेतात घाम गाळून, रक्त आटवून पिक घेतो, त्याच्या हाती येत काय, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. राज्यात धान खरेदी केंद्र सरु झाली. महाविकास आघाडी सरकारचं सरकार होतं. पण त्यांनी अर्धी तुर खरेदी केली नाही, ना त्याचे पैसे दिले. त्यांनी धान उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला, तुर उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला. अजून त्याचे अर्धे पैसे दिलेले नाही.

त्यात अतिवृष्टी झाली हा भाग तर वेगळा पण तुम्ही जी तलावर चालवता त्याचं काय, ही तलवार चालवलेली दिसत नाही. धो-धो पडणारा पाऊस सर्वांना दिसतो. पण आम्ही जे शेतकऱ्यांना कापतो, ते कोणाला दिसत नाही. आपण तर जखमेवर मीठ टाकणारी औलाद आहोत.

जर राज्यात, तुमच्या भागात, नुकसान होत असेल, एखादा कायदा येत असेल आणि त्यामुळे माझ्या मतदार संघातलं नुकसान होतं असेल,तर मी बोलू शकत नाही, कारण राज्यात माझ्या पक्षाचं सरकार आहे. तेव्हा पक्ष महत्वाचा आहे, अशी खंतही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com