शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर मेहेरबानी; बाळासाहेबांचे नातू असल्यानं घेतला मोठा निर्णय

शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप बजावला होता.
Aaditya Thackeray Latest News, Eknath Shinde Latest News
Aaditya Thackeray Latest News, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या बंडांमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं. विधिमंडळातील खरी शिवसेना कोणती, प्रतोद, गटनेता कोण हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे गट व शिवसेनेने (Shiv Sena) एकमेकांविरोधात व्हीप काढले. आता दोन्ही बाजूंकडून व्हीप झुगारलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. (Aaditya Thackeray Latest News)

शिंदे गटाने शिवसेनेतील 15 पैकी 14 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अध्यक्षपदाची निवडणूक व बहुमत चाचणीसाठी व्हीप काढला होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान करावे तसेच बहुमत चाचणीवेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे सांगण्यात आले होते.

Aaditya Thackeray Latest News, Eknath Shinde Latest News
'राष्ट्रवादी'च्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं घडलं अन् अजितदादांना मिळाला पहिला मान!

पण आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व पंधरा आमदारांनी हा व्हीप झुगारला. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यातून आदित्य यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. याबाबत गोगावले यांनी खुलासा केला आहे.

आदित्य हे यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आली नाही. ते बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो. त्यामुळे आदित्य यांना नोटीस पाठवली नसल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही गोगावले म्हणाले. शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उर्वरित आमदारांवर मात्र निलंबनाची टांगती तलवार राहणार आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनीही 40 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मतदान करण्याचा व्हीप त्यांनी बजावला होता. त्यामुळे आता नेमका व्हीप कुणाचा मान्य केला जाणार, याबाबत कायदेशीर लढाई होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. विधानसभा अध्यक्षांनी गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती मान्य केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com