निलेशच्या माघारीसाठी राणेंवर भाजपचा दबाव ?

राणे यांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा केल्यास त्यातून युतीत चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण राणे भाजपचे खासदार असून, ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्यही आहेत.
निलेशच्या माघारीसाठी राणेंवर भाजपचा दबाव ?

मुंबई : आपल्यावर कोणाचाही दबाव नाही . रत्नागिरी- सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढविणारच ,असे नारायण राणे यांनी साम वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले . 

नारायण राणे यांच्या चिरंजीवांनी रत्नागिरी लोकसभा लढवू नये असा दबाव भाजपतर्फे नारायण राणे यांच्यावर टाकण्यात येत असल्याच्या बातम्या आहेत . त्यामुळे नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निलेश राणे  निवडणूक लढविणाराच असल्याचे स्पष्ट केले . 

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून नारायण राणे यांना ही जागा सोडू नये यासाठी काँग्रेस  पक्षाने रत्नागिरी मतदारसंघ आपल्याकडेच आग्रहाने ठेवून घेतला आणि   नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारीही जाहीर केली आहे . काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी रत्नागिरीची जागा काँग्रेसकडे राखण्यासाठी बराच जोर लावला होता असे समजते . 

नारायण राणे हे भापचे खासदार आहेत . ते भाजपच्या जाहीरनामा समितीवर देखील आहेत . त्यामुळे नारायण राणे यांनी युती धर्म पळून रत्नागिरीची जागा लढवू नये यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी नारायण राणे यांना तसे सुचवूनही पहिले असल्याचे समजते . मात्र नारायण राणे यांनी आपण भाजप बरोबर असलो तरी रत्नागिरी आणि अन्य काही ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केलेले असून औरंगाबाद मतदारसंघात त्यांनी सुभाष पाटील यांची उमेदवारी जाहीर देखील केलेली आहे . 

शिवसेनेतर्फे भाजपवरही नारायण राणे यांच्या या उपक्रमाबद्दल दबाव टाकला जात असून हे युती धर्माला धरून होत नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com