मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर सतत हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar )यांच्या जिवाला धोका असल्याचे पत्र विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे.
सोलापूर आणि सांगलीमध्ये पडळकरांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे फडणवीस यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. ''विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी,'' असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात..
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जिवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूनं उभ राहिल्यानं यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करीत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेन दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, त्यांच्या जिवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या.
'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांना अटक; आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य
नागपूर : कापूस-सोयाबीन प्रश्नावर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते (swabhimani shetkari sanghatana) रविकांत तुपकरांनी (ravikant tupkar) बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होत. त्यांना रात्री उशीरा नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. तुपकर यांच्या अटकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तुपकर यांनी पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवले. बुधवारी रात्री नागपूर पोलिसांनी रात्री ही अटक केली. कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर रविकांत तुपकरांनी (ravikant tupkar) नागपुरात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरू केलं होत. मात्र, नागपुरातील तुपकरांच्या आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. अटक केलेल्या तुपकरांना रातोरात पोलिस बंदोबस्तात बुलढाण्याकडे रवाना करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.