सोमय्यांचा परबांना पुन्हा इशारा ; साई रिसॅार्टवरुन वाद पेटला

सरकारी दस्ताऐवजात खाडाखोड, मंत्रीपदाच्या दुरुपयोग आदी आरोप सोमय्यांनी परब यांच्यावर केला आहे
Kirit Somaiya, Anil Parab
Kirit Somaiya, Anil Parabsarkarnama

मुंबई : येत्या काळात शिवसेनेचे नेते, राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab)व भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत. सोमय्यांनी टि्वट करुन परब यांचे दापोलीतील रिसॅार्ट तोडण्याचा इशारा दिला आहे.

अनिल परब यांच्या दापोली येथील अनाधिकृत रिसॅार्ट, सीआरझेडच्या नियमांचा भग, वन व पर्यावरणाचे नुकसान, सरकारी दस्ताऐवजात खाडाखोड, मंत्रीपदाच्या दुरुपयोग आदी आरोप सोमय्यांनी परब यांच्यावर केला आहे. या रिसॅार्टवर कारवाई व्हावी, यासाठी येत्या २६ तारखेला सोमय्या हे दापोली येथे जाणार असल्याचे टि्वट त्यांनी केलं आहे.

Kirit Somaiya, Anil Parab
सरड्याप्रमाणे रंग बदलणारे ठाकरे सरकार ; त्यांचा खरा रंग जनतेसमोर आणणार!

साई रिसॉर्टचे बांधकाम करताना बिनशेती परवानगी, रस्ता, घरपट्टी आदींबाबत नियमांचे उल्लंघन करून केलेले आहे का याबाबतची वस्तूस्थिती तपासण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले होते. सोमय्या यांनी दापोली पोलिस स्टेशनला परब यांच्या साई रिसॅार्ट विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी दिले होते. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सीआरझेड कायद्याचे (law of CRZ) उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते.

Kirit Somaiya, Anil Parab
काश्मीर फाईल्स नाही तर झुंड, पावनखिंडही टॅक्स फ्री करा : रा. स्व संघाची मागणी

फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते.

रिसॉर्ट बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र हे पैसे आले कुठून? यावर आयकर विभागाकडून चौकशीदरम्यान आक्षेप घेण्यात आल्याचे दिसते. यासंबंधी आयकर विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले पत्र किरीट सोमय्या यांनी काल ट्विट केले आहे. 'अनिल परब साहेब आयकरचे म्हणणे आहे की कोट्यवधी रुपये आले कोठून? वाझेचे की खरमाटेचे? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात अनिल परब व किरीट सोमय्या वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com