मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे कार्यभार देऊन आराम करावा!

भाजप (BJP) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.
Prasad lad, Uddhav Thackeray

Prasad lad, Uddhav Thackeray

sarkarnama

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Assembly Winter Session) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अनुपस्थित राहिल्याने त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे कार्यभार देऊन आराम करावा, असा उपरोधक टोला भाजपचे (BJP) राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी लगावला आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मुख्यमंत्री सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाला उपस्थित नाहीत. त्यावरुन विरोधी पक्षातल्या नेत्यांनी टीका करताना मुख्यमंत्र्यांना पर्याय उभा करण्याचे सुचवले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही अशीच मागणी केली होती.

<div class="paragraphs"><p>Prasad lad,&nbsp;Uddhav Thackeray</p></div>
अधिवेशनातील चेहरा : आमदार महेश शिंदेंसाठी चार मंत्री लगबगीने आले...

लाड म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी भाजचे सर्व नेते प्रार्थना करीत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अधांतरी आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थोडा आराम करावा आणि मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा अजित पवार यांच्याकडे द्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार कोणाला द्यायला हवा हा खरं तर मुख्यमंत्र्यांचाच प्रश्न आहे. मात्र, दादांचा अनुभव लक्षात घेता तसेच, उपमुख्यमंत्री म्हणून तांत्रिकदृष्ट्या तो त्यांच्याकडेच द्यायला हवा. पण जर, तीन तिघाडीत त्यांना मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे द्यायचे नसेल, तर त्यांनी तो कार्यभार आदित्य ठाकरेंकडे अथवा एकनाथ शिंदेंकडे द्यावा. त्यामुळे राज्याचा निदान कारभार थांबणार नाही, असे उपरोधकपणे लाडांनी सुनावले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे हे मागच्या काही दिवसांपासून प्रकृती कारणामुळे विश्रांतीवर आहेत. त्यामुळे ते प्रत्यक्ष राज्याच्या कारभारात सहभागी दिसत नाहीत. यामुळे त्यांच्यावर सातत्याने विरोधक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. त्यात बुधवारपासून (ता.22 डिसेंबर) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनात मुख्यमंत्री ठाकरें सहभागी होतील असे ठासून उपमुख्यमंत्र्यानी सांगितले आहे. मात्र, दोन दिवस अधिवेशचे उलटले तरी, त्यांचा सहभाग झाला नसल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

<div class="paragraphs"><p>Prasad lad,&nbsp;Uddhav Thackeray</p></div>
चंद्रकांतदादा-फडणवीसदादा ओबीसींसाठी दिल्लीला जा; हवे तर मी तिकीट काढून देतो

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे आता फिट असून त्यांनी आज मंत्रिमंडळाची बैठकही घेतली असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मला राज्याच्या जनतेला हेच सांगायचे आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक आहे. मंत्री मंडळाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री कॅबिनेटला ऑनलाईन उपस्थित राहिले आहेत. तसेच मुख्यमंत्री ठणठणीत असल्याचेही सांगितले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री अधिवेशनाला आले नाहीत म्हणून त्यांची मस्करी उडवली जात आहे. पण मागील काही दिवसांपासून संसदेत पंतप्रधान दिसले नाहीत. जे नियम पंतप्रधान मोदी यांना लागू आहेत ते सर्वांना असावे, असा टोला लगावायला ते विसरले नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे हे सोमवारी सभागृहात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com