भाजप मोहिम फत्ते कशी करणार? आमदारांना दुपारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश

भाजप नेत्यांनी मंगळवारी रात्री राज्यपालांची भेट घेतली होती.
Devendra Fadnavis Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी तीन वाजता भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. तसेच सर्व आमदारांना दुपारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. सायंकाळी पाच वाजता प्रेसिडंट हॉटेलमध्ये आमदारांची बैठक होणार असल्याचे समजते. (Maharashtra Political Crisis)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरूवारी बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिले आहे. शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट उद्या (३० जून) मुंबईत येणार आहेत. ही माहिती स्वत: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. पण आजच ते गोव्याकडे रवाना होणार आहेत. सुरूवातीला सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलेले हे आमदार आता गोव्यात जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

Devendra Fadnavis Latest Marathi News
शिरगणती, व्हिडीओ शुटींग..! राज्यपालांनी घेतलीय पुरेपूर काळजी; काय म्हटलंय आदेशात?

भाजपनेही सर्व आमदारांना दुपारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणीदरम्यान कोणती रणनीती असेल याबाबत सर्व आमदारांना सुचना देण्यात येणार आहेत. सर्व आमदारांना हॉटेल प्रेसिडेंटमध्ये थांबवले जाणार आहे. तिथून हे सर्व आमदार विधानभवनात दाखल होणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे व तीन-चार आमदार वगळून इतर सर्व आमदार गुवाहाटीतून निघण्यापूर्वी कामाख्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तिथून ते थेट विमानतळावर जातील. त्यासाठी दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळावरून या आमदारांना गोव्याला नेले जाणार आहे.

गोव्यात त्यांच्यासाठी ताज रिसॉर्ट 70 खोल्या बुक करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर हे आमदार गुरूवारी सकाळी गोव्यातून मुंबईत दाखल होतील, असं सांगितलं जात आहे. बंडखोर आमदारांविरोधात सुरू असलेल्या शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे ही दक्षता घेण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच शिगेला पोहचला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधाभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र पाठवले. यानंतर गुरुवारी (३० जून) उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या पत्रानंतर 30 जूनला बहुमत चाचणी करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com