राष्ट्रवादीच्या बँकांविरोधात ईडी, सीबीआयकडे तक्रार करणार ; दरेकर संतापले

ही बँक एकट्या प्रवीण दरेकर (pravin darekar) यांची नाही आहे. यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे (ncp) 6 संचालक आहेत.
pravin darekar
pravin darekarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) अध्यक्ष असलेल्या मुंबै (mumbai bank) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गेल्या पाच वर्षातील अनियमिततेची गंभीर दखल घेत बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरेकरांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की ही बँक एकट्या प्रवीण दरेकर (pravin darekar) यांची नाही आहे. यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे (ncp) 6 संचालक आहेत. यामध्ये शिवाजीराव नलावडे, अजितदादांच्या जवळचे सहकारी सिद्धार्थ कांबळे या बॅंकेत आहेत. तसेच सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर हे देखील आहेत. मग कारवाई झाली तर केवळ प्रवीण दरेकरांविरोधात होणार नाही. तशी सुतराम शक्यता नाही. पण केवळ द्वेषाचं राजकारण करायचं म्हणून मुंबै बँकेची चौकशी सुरु केलेली आहे.

pravin darekar
अजितदादांनी दिलेला शब्द पाळला

सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी घेतलेला आहे. अशा चौकशांना मी घाबरत नाही, भीकही घालत नाही. राजकारणापोटी आर्थिक संस्थेला वेठीस धरु नका, असं प्रवीण दरेकर म्हणाले. राज्य सरकारकडून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची बँकेच्या चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार कायद्याच्या कलम 83 नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दिले आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेतही गैरव्यवहार आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या बँकांनी आम्ही चैाकशी करणार आहोत. सरकारने बँकेची चौकशी लावून एक बोट मुंबै बँकेकडे केले आहे, पण त्याचवेळी राष्ट्रवादीने हे पण लक्षा ठेवावे की एक बोट आमच्याकडे करताना तुमच्याकडे चार बोटं आहेत, असे सांगून दरेकरांनी सहकारातील घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.

आता राष्ट्रवादीने देखील पुढच्या सामन्याला तयार रहावं. कारण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सगळ्या जिल्हा बँकांच्याविरोधात मी ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकर यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com