BMC News : महाआघाडीचा आणखी एक निर्णय चौकशीच्या फेऱ्यात अडकणार : भाजप आमदाराची फडणवीसांकडे तक्रार

प्रत्येक पैशाचा वापर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी होणार होता.
BMC
BMC
Published on
Updated on

Five Star Service to BMC Officers during Covid 19 : कोरोना साथीच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्यावर ३४ कोटी ६१ लाख ५२५ रुपयांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची एसीबी चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात राज्यभरात ऑक्सिजन प्लांट, बेड्स, वेटिलेटर, औषधं, पीपीई किट, ग्लोज, मास्क यांचा तुटवडा भासत होता. प्रत्येक पैशाचा वापर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी होणार होता. पण बीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. पण सामान्यांच्या जीवाजी पर्वा न करता मनपाच्या २४ वॉर्डमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्यावर आणि खाण्यावर तब्बल ३४ कोटीहून अधिक खर्च करण्यात आला, असा आरोप कोटेचा यांनी केला आहे.

BMC
Devendra Fadanvis : 'शिंदे गटातील २० आमदार फोडून फडणवीस मुख्यमंत्री बनणार?'

अधिकाऱ्यांना पंचतारांकित सुविधा मिळत असताना दूसरीकडे मात्र आपला जीव धोक्यात घालून सुविधा पुरवणाऱ्या कंत्राटी परिचारकांना मात्र सेवेचा मोबदला दिला जात नव्हता. पण आर्थिक संकटातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र पंचतारांकित सेवा दिली जात होती, असंही कोटेचा यांनी म्हटलं आहे.

वाचा, काय म्हटलं आहे मिहीर कोटेचा यांनी पत्रात

कोरोना महामारीची भीषणता आपण दोन लाटांमध्ये अनुभवली. संपुर्ण जग दोन वर्ष ठप्प होते. सामान्यांचे जीव वाचवेत म्हणून अनेक असामान्य व्यक्तींनी सेवा केल्यामुळेच कोरोनासारख्या भीषण विषाणूवर आपण मात करु शकलो. एकीकडे सामान्यांना जीवनदान मिळवून देण्यसाठी तुम्हीही कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतात, पण दुसरीकडे मात्र मढ्यावरचे लोणी खाणारी टोळी मोकाट फिरत होती. त्यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मनपाच्या २४ वॉर्डमधील अधिकाऱ्यांच्या सुविधांसाठी ६ मे २०२० ला ३४ कोटी ६१ लाख ५२५ रुपयांचा शासकीय खर्च मंजूर केला.

या भ्रष्टाचाराच्या दलदलीत मनपा प्रशासन आणि तत्कालीन महाआघाडी सरकारचे हात निष्पापांच्या रक्ताने ही माखले आहेत का? हा सवाल प्रत्येक मुंबईकर करतो आहे. कोरोना काळात जीव गमावलेल्या निष्पाप मुंबईकरांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची क्षमता तुमच्यात आहे. त्यामुळं या अनावश्यक खर्चाची आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशी करावी, शिंदे-फडणवीस सरकार हे न्यायाचं सरकार आहे, हा संदेश द्यावा, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com