यापूर्वीही पवारांनी अशा परिस्थितीतून पक्षाला पुन्हा उभारी दिली आहे : भुजबळ 

.
Chagan-Bhujbal
Chagan-Bhujbal

मुंबई : " यातूनही पक्ष उभा राहील . शरद पवारांनी  पवारांनी यापूर्वीही अशा परिस्थितीतून पक्षाला पुन्हा उभारी दिली आहे," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला . राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते बाहेर पडून भाजप - शिवसेनेत जात आहेत याबाबत प्रतिक्रिया देताना श्री. छगन भुजबळ बोलत होते . 

 छगन भुजबळ पुढे म्हणाले, "  आता जी माणसे सोडून जात आहेत त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान तर निश्चित आहे . नुकसान झालेले नाही हे म्हणण्यात काही अर्थ नाही . नुकसान तर झालेले आहे. शिवेंद्रराजे काय किंवा पिचड साहेबांचा मुलगा काय  पक्षाचे नुकसान होत आहे . सोडून जाणारयापैकी अनेक नेते जुने काँग्रेसचे नेते आहेत . "

श्री.   भुजबळ म्हणाले ,"आता सोडून चाललेली माणसं वसंतदादांपासून काँग्रेसचे काम करत होती . विजयसिंह मोहिते पाटील आणि पिचड साहेब  काहीजण वसंतदादांची ही खास माणसे होती . निश्चितपणे सामाजिकदृष्ट्याही या माणसांचा अनेक ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे . सामान्य कार्यकर्ता जरी पक्ष सोडून गेला तर नुकसान होते. ही तर नेते मंडळी आहेत , आमदार आहेत . " 

" पण प्रत्येक निवडणुकीत हे होतं, इकडचा माणूस तिकडे गेला - हा आला, पण आता त्याचं प्रमाण यावेळी वाढलं आहे. पण ठीक आहे .  हे चालू असतं.   यातूनही पक्ष उभा राहील . शरद पवारांनी  पवारांनी यापूर्वीही अशा परिस्थितीतून पक्षाला पुन्हा उभारी दिली आहे , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com