Maharashtra Karnatak Dispute : 'अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल', संभाजीराजेंचा कर्नाटकला इशारा

Maharashtra Karnatak Dispute : महाराष्ट कर्नाटक प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती आक्रमक
Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapati Sambhaji RajeSarkarnama

Maharashtra Karnatak Dispute : बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. यावरून आता राज्यातील नेते आक्रमक झाले आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी (Chhatrapati Sambhaji Raje) आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला.

या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्वीटमध्ये संभाजीराजे म्हणाले, ''छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत, त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी, अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल'' असा इशारा त्यांनी दिला आहे.

Chhatrapati Sambhaji Raje
Maharashtra-Karnataka Dispute : सीमावादात मोठी अपडेट; एकीकरण समिती मोदी,शहांना लिहिणार पत्र!

शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही आपली प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. राज्य सरकार डोळे मिटून बसले आहे का? स्वाभिमान, अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला.

या प्रकरणावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की ''एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का?'' असा तिखट सवाल त्यांनी केला.

Chhatrapati Sambhaji Raje
Maharashtra Karnataka Dispute : बेळगावमध्ये तणाव; ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात शिवसैनिकांनी आंदोलन केले. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे-फडणवीस सरकारचे पोलीस लाठ्या काठ्यांनी मारहाण करत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. कोल्हापुरातही तेच सुरु आहे, तुम्ही कोणाचे काम करत आहात, असा प्रश्न राऊत शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com