ही लढाई कोरोनाविरूध्द...मोदींविरूध्द नव्हे : देवेंद्र फडणवीस

सरकारला आम्ही सहकार्य करत आहे. अधिवेशन दोन दिवसांचे, प्रश्‍नोत्तरे नाहीत, असा निर्णय घेतला त्याला आम्ही सहकार्य केले. कोरोना लढाईत आम्ही सरकार सोबत आहोत. तरीही मंत्रिमंडळातील सर्वांकडून केवळ केंद्र शासनाकडून निधी येत नसल्याची ओरड केली जाते. प्रत्यक्षात सर्वात अधिक महाराष्ट्राला निधी मिळाला आहे.
BJP Leader Devendra Fadanvis
BJP Leader Devendra Fadanvis

कोल्हापूर : आपली कार्यक्षमता लपविण्यासाठी केंद्र सरकारकडून काहीच मदत येत नसल्याचे भासविले जात आहे. प्रत्यक्षात पीएम केअर मधून सर्वाधिक मदत महाराष्ट्र सरकारला झाली आहे. ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध नव्हे तर कोरोना विरुद्ध आहे. त्यामुळे निर्णय मातोश्री वरून घ्या, वर्षावरून घ्या, मंत्रालयातून घ्या, अन्यथा दौर करून घ्या. पण निर्णय घ्या. उशिरा झालेल्या निर्णयाला अर्थ राहणार नाही, असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या तीनशे आयसीयु आणि चारशे ऑक्‍सिजन बेडचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब मंजुर करावा. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना हे ज्ञात करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेली दोन दिवस ते पश्‍चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास ते कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय (सीपीआर) मध्ये भेट देवून माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धावती आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारला आम्ही सहकार्य करत आहे. अधिवेशन दोन दिवसांचे, प्रश्‍नोत्तरे नाहीत, असा निर्णय घेतला त्याला आम्ही सहकार्य केले. कोरोना लढाईत आम्ही सरकार सोबत आहोत. तरीही मंत्रिमंडळातील सर्वांकडून केवळ केंद्र शासनाकडून निधी येत नसल्याची ओरड केली जाते. प्रत्यक्षात सर्वात अधिक महाराष्ट्राला निधी मिळाला आहे. सरकारकडूनही प्रोॲक्‍टीव्ह रोल पाहिजेत तो होताना दिसत नाही, असे त्यांनी
स्पष्ट केले. 

मुंबईतील मेट्रो कारशेड प्रश्‍नांवर फडणवीस म्हणाले, "2022 मध्ये हे काम पूर्ण झाले असते. मात्र आता त्याला आणखी दीड-दोन वर्ष जादा लागणार आहेत. रोज कोट्यवधी रूपयांनी प्रोजेक्‍टचा खर्च वाढत आहे. जपानी कंपनीने त्याचा सर्व्हे केला होता. त्यांच्याकडून पुन्हा त्याची माहिती घेऊन सर्व्हे करावा लागेल. नव्याने जागा पहावी लागेल. त्यामुळे प्रोजक्‍ट स्थगित ठेऊन सरकारने योग्य काम केले नाही. हे कोणासाठी चालले आहे, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.  

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, "आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. केवळ नाकर्तेपणा लपविण्यासाठी आम्हाला त्यामध्ये ओढले जाते. त्याबाबत मी कोणतीही टिका करणार नाही. बोलणार नाही.'' याचबरोबर कोल्हापुरातील स्थानिक रेड आणि ब्ल्यू लाईनचा प्रश्‍न राज्यकर्त्यांनी सोडविला पाहिजे. त्याबाबत मी काही बोलणार नाही. पण अलमट्टी धरणाची उंची वाढवणे हे खपवून घेणार नाही. ते बांधतानाच विरोध केला असता तर आत्ता ही परिस्थिती आली नसती.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com