दाऊदचा राइट हॅन्ड बोलतो...  गृहमंत्र्यांच्या घरी पुन्हा धमकीचे फोन !

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आलेला धमकीचा फोन हा दिल्लीतून असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्याचे नाव सूरजकुमार आहे, अशीही माहिती मिळतेय. त्या व्यक्तीचा फोन नंबर आणि ठिकाण यावरून पोलीस हायटेक यंत्रणेचा वापर करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्यांचे फोन आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास पुन्हा धमकीचा फोन आला. येवढेच नव्हे तर गृहमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही फोन आला. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा राइट हॅन्ड म्हणून सांगितली आहे. " कंगना राणावतच्या प्रकरणात लक्ष घालू नका अन्यथा उडवून देऊ" अशी धमकी त्याने दिली असल्याचे सांगण्यात येते. 

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अभिनेत्री कंगना राणावत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील मंत्र्यांना धमकीचे फोन येऊ लागले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांनाही धमकीचे फोन यापूर्वी आले आहेत. या प्रकरणाची तक्रार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे करण्यात आली. गृहमंत्र्यांना धमकीचा फोन आल्यामुळे पोलिस  विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या फोनबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आलेला धमकीचा फोन हा दिल्लीतून असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्याचे नाव सूरजकुमार आहे, अशीही माहिती मिळतेय. त्या व्यक्तीचा फोन नंबर आणि ठिकाण यावरून पोलीस हायटेक यंत्रणेचा वापर करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.      (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com