Name Change Of Constituency: पाच विधानसभा अन् तीन लोकसभा मतदारसंघाची नावे बदलणार

Ahmednagar, Aurangabad, Osmanabad Constituency Name Change: मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला असतो. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार आहे.
Election Commission of India
Election Commission of IndiaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील 5 विधानसभा मतदारसंघाची नावं बदलणार असल्याचे समजते. राज्यातील तीन लोकसभा मतदारसंघाची नावे बदलणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मतदारपूर्नरचनेनंतर केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) या मतदारसंघाची नावे बदलणार आहे.

संभाजीनगर जिन्ह्यातील नऊपैकी तीन विधानसभा मतदारसंघांच्या नावामध्ये बदल होणार आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाची नावे बदणार आहे. डिलिमिटेशननंतर ही नावे बदलण्यात येणार आहेत.

अहमदनगरशहर विधानसभा मतदारसंघाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ असे नाव होणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघाचे नाव धाराशिव विधानसभा मतदारसंघ असे होणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभेच्या तीन मतदारसंघाची नावे देखील बदलली जाणार आहेत.अहमदनगरचे अहिल्यानगर, औरंगाबादचे छत्रपत्री संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव लोकसभा मतदारसंघ असे नामकरण होणार आहे.

Election Commission of India
Maharashtra Assembly Election 2024: संदीप नाईक यांनी वाजवली 'तुतारी'; निलेश राणे उचलणार 'धनुष्यबाण'

मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन)असतो.डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मतदारनोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे, याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण केले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसर्‍या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकाशित केली आहे. वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com