मराठा आरक्षण, महामंडळाच्या निधीतही ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा : नरेंद्र पाटील

दर महिन्याला आठ कोटीपेक्षा जास्त रक्कम ही तर व्याज परताव्यातच जाते. यानुसार कमीत कमी ९६ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. हे माहित असूनही वर्षाकाठी व्याज परतावा दिला जाईल, त्याच्या निम्मी रक्कमही सरकारने दिलेली नाही.
Denial of funds to the corporation; The role of Thackeray government is against the Maratha community says Narendra Patil
Denial of funds to the corporation; The role of Thackeray government is against the Maratha community says Narendra Patil

सातारा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित ५० कोटी इतक्या तरतूदीपैकी फक्त २५ टक्के निधी म्हणजेच १२.५० कोटी निधी वितरित करण्यात येत असल्याचे पत्र मिळाले आहे. या तुटपुंज्या निधीचे हस्तांतर कसे करायचे हा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाबाबतही आणि आता निधीच्या बाबतीतही सरकारचा नाकर्तेपणा समोर आला आहे. वेळोवेळी ठाकरे सरकार मराठा समाजाच्या विरोधी भूमिका घेत आहेत, अशी टीका माजी आमदार व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे. Denial of funds to the corporation; The role of Thackeray government is against the Maratha community says Narendra Patil

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला शासनाने १२.५० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. या तुटपुंज्या निधीवरून नरेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकारचा तीव्र निषेध करत टीकास्त्र सोडले आहे. यासंदर्भात श्री. पाटील यांनी म्हटले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला सन २०२१-२२ या आर्थिक 
वर्षामध्ये अर्थसंकल्पित ५० कोटी इतक्या तरतूदीपैकी फक्त २५ टक्के निधी म्हणजेच १२.५० कोटी निधी वितरित करण्यात येत असल्याचे पत्र मिळाले आहे.

यापैकी तर दर महिन्याला आठ कोटीपेक्षा जास्त रक्कम ही तर व्याज परताव्यातच जाते. यानुसार कमीत कमी ९६ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. हे माहित असूनही वर्षाकाठी व्याज परतावा दिला जाईल, त्याच्या निम्मी रक्कमही सरकारने दिलेली नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून साधारण ३० हजार मराठा बांधवांनी लाभ घेतला आहे. 

२००० कोटींचे कर्ज राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांच्या मार्फत व्यवसायासाठी दिलेले आहे.  इतका मोठा आवाका असूनही या तुटपुंज्या निधीचे हस्तांतर करावे तरी कसे, हा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही तसेच आणि आता निधीच्या बाबतीतही सरकारचा नाकर्तेपणा समोर येत असून वेळोवेळी ठाकरे सरकार मराठा समाजाच्या विरोधी भूमिका घेत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com