मुंबई: पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या अटकेशी आपला संबंध नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
शिवाजीराव भोसले बॅंकेतील घोटाळा प्रकरणात काल रात्री बँकेचे अध्यक्ष, आमदार अनिल भोसले यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या अटकेचे राजकीय अर्थ लावण्यात येत आहेत.
अनिल भोसले हे राष्ट्रवादीकडून निवडून आले, मात्र नंतरच्या काळात त्यांची भाजपशी जवळीक राहिली. यासंदर्भाने या अटकेची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे या बँकेचे कर्जदार होते. त्यांनी यासंबंधाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, पुण्यातील शिवाजीराव भोसले बॅंकेकडून फ्लॅटसाठी घेतलेले कर्ज थकले होते, मात्र त्याची परतफेड केली असून, त्याआधी बॅंकेने माझ्या फ्लॅटला ‘सील’ केले होते. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवाजीराव भोसले बॅंकेचे संचालक अनिल भोसले यांच्या अटकेशी त्याचा संबंध नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.