दिशा सॅलियन प्रकरण राणे पिता-पुत्राला भोवणार? थेट राष्ट्रपतींकडे तक्रार

नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना नुकताच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
Nitesh Rane and Narayan Rane
Nitesh Rane and Narayan RaneSarkarnama

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) हिची बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना नुकताच अटकपूर्व जामीन मिळाला आहे. पण त्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. दिशाच्या आई-वडिलांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे. (Disha Salian case news updates)

एका पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी दिशाबाबत बदनामीकरक विधान केले होते. यावेळी आमदार नितेश राणे हेही उपस्थित होते. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाच्या पालकांनीही आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यावर राजकारण केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. राणे पिता-पुत्रांकडून या प्रकरणावर सातत्याने भाष्य केलं आहे. दिंडोशी न्यायालयाने त्यांना काही अर्टी-शर्तीसह नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Nitesh Rane and Narayan Rane
... तर 2011 ची पुनरावृत्ती होईल! संतापलेल्या आमदार शेळकेंनी विधानसभेतच दिला इशारा

आता दिशाचे आई-वडील थेट राष्ट्रपतींकडे गेले आहेत. त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पाच पानी पत्रात राणेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रिपल्बिक टीव्ही आणि न्यूज नेशन या वृत्तवाहिन्यांनी आपल्या मुलीची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी माफी मागावी, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. मुलीच्या मृत्यूचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशाच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून राणे पिता-पुत्रावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिशाचे आई-वडीलांनीही महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणावर राणेंकडून अप्रत्यक्षपणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

Nitesh Rane and Narayan Rane
अत्यवस्थ वडिलांना दिलेल्या शब्दाला फडणवीस जागले! सदाभाऊंनी सांगितली आठवण

''दिशावर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणे व नितेश राणे हे दिशासोबत मृत्यूपूर्वी झालेल्या बलात्काराबाबत विधान केले होते. दिशाच्या मृत्यूबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा राणे पिता-पुत्र करत असले तरी तो सुपूर्द करण्यास त्यांनी नकार दिला आहे. दिशाच्या मृत्यूचा तपास सुरू असतानाही त्याबाबतचा पुरावा दोघांनी कोणत्याही तपास यंत्रणेकडे सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे हा पुरावा काय आहे हे शोधण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी राणे पितापुत्राच्या अटकपूर्व जामिनाला प्रतिज्ञापत्रा्द्वारे विरोध करताना म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com