'भ्रष्टाचाराचे आरोप होणारे नेते भाजपमध्ये गेले की पवित्र होतात का?' - नाना पटोले

Nana Patole| Kirit Somaiya| महत्वाच्या विषयांवरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपचा डाव
Nana Patole| Kirit Somaiya|
Nana Patole| Kirit Somaiya| sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, शेतकरी, कामगार यांसारख्या महत्वाच्या विषयांवरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठी ते दररोज महाविकास आघाडींच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून महाराष्ट्र भ्रष्टाचारी राज्य असल्याचे प्रतिमा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. पण भाजपचा हा आरोपांचा खेळ राज्यातील जनतेच्या लक्षात आला आहे. जनता भाजपाचा (BJP) हा खेळ ओळखून आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

याचवेळी त्यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरही निशाणा साधला.'' किरीट सोमय्या दररोज आरोप करून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, आता ते भाजपात गेले तर मग ते पवित्र झाले का? असा प्रतिप्रश्नही नाना पटोले यांनी केला.

Nana Patole| Kirit Somaiya|
नाना पटोले म्हणाले भ्रष्टाचार करणाऱ्या ‘त्या’ संस्थांना ब्लॅकलिस्ट करा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. त्यावर किरीट सोमय्या यांनी नारायण राणे व कृपाशंकर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपाचे पुढे काय झाले? ज्यांच्यावर आरोप केले जातात ते भाजपात गेले की पवित्र होतात का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांच्या राजीनामाची मागणीही साफपणे धुडकावून लावली. तसेच किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपातील किती आरोप सिद्ध झाले. आरोप करणे व लोकांची बदनामी करणे, हा किरीट सोमय्याचा धंदा आहे,असा टोलाही त्यांनी लगावला.

- शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी

दरम्यान, राज्यातील आरोग्य सेवा परीक्षा व म्हाडा (MHADA) प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परीक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे नुकसान झाले. या परीक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता. त्यामुळे शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी, अशीही मागणी नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात भाग घेत नाना पटोले म्हणाले की, आरोग्य सेवा व म्हाडाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याचे निदर्शनास आले असून ते खरे आहे का? शासनाच्या विविध विभागांतील भरती प्रक्रियेच्या परीक्षा खाजगी संस्थेमार्फत राबवण्यात येत असल्यामुळे पेपर फुटीचे प्रमाण वाढले आहे. या पेपर फुटीमुळे उमेदवारांचे मोठे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी शासनाच्या पदभरती प्रक्रिया शासनामार्फत राबविल्या जाव्यात, याबाबत काही कार्यवाही झाली आहे का, असा नाना पटोलेंनी विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com