Raj Thackeray : उद्या तोंड उचकटू नका, अन्यथा...; राज ठाकरेंचा ठाकरे गटाला इशारा

MNS News : पाकिस्तानाला खडे बोल सुनावणारे जावेद अख्तरांचे कौतुक
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : गुढीपाडव्यानिमित्त आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थ मैदानावर सभा पार पडली. सभेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर, सांगली कुपवाड येथे अनधिकृत बांधकामाकडे लक्ष वेधले. प्रशासनच अशा अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे यांनी शिवसेनेचे (Shivsena) चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, "शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य होते. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते. एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का?"

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मूळ शिवसेनेची (Shivsena) सध्या झालेल्या अवस्थेला 'महाबळेश्वर'च्या प्रसंगापूर्वी अनेक गोष्टी घडल्या, त्या कारणीभूत असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच शिवसेनेच्या स्थितीला जाबाबदार असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

त्यानंतर त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांना उद्या एकही शब्द न बोलण्याच्या इशारा दिला आहे. ठाकरे म्हणाले, "आत्ताच त्यांच्या बाजूच्या लोकांनाही सांगतो माझे बोलणे झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका, नंतर मी जे काही बोलेन त्यामुळे तोंड लपवावे लागेल."

Raj Thackeray
Raj Thackeray : ''एकदा हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला उत्तर देण्याऐवजी जनतेची कामे करा, असा सल्ला ठाकरेंनी शिंदेंना दिला. राज ठाकरे म्हणाले, "माझी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्यामागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी घेतली वरळीत सभा घेतली. खेडमध्ये सभा घेतली घेतली शिंदेनी खेडनमध्ये सभा. थांबवा हे!"

Raj Thackeray
Raj Thackeray : राणेंनी कधीच पक्ष सोडला नसता पण....; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग!

या सभेत राज ठाकरे यांनी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचे कौतुक केले. ते म्हणाले, "मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे, पण तो मुसलमान जावेद अख्तर यांच्यासारखा हवा. असा मुसलमान पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावून येईल."

सांगलीतील (Sangli) एका घटनेकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. ठाकरेंनी सांगितले की, "सांगली, कुपवाड येथून मध्यंतरी एक पत्र आले होते. तेथील रहिवाशांनी ते लिहिले आहे. हा भाग हिंदुबहुल आहे. इथल्या एका मोकळ्या जागेवर मुसलमानांनी अतिक्रमण केले, आम्ही विरोध केला तर आम्हाला धमक्या दिल्या, त्रास दिला. त्याची पोलिसांनी दखल घेतली नाही; तिथे मशीद बांधली जात आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com