मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस (Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना मंगळवारी ( १९ जुलै) ईडीने अटक केली. काल ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांंना अटक करण्यात आली.
संजय पांडे यांच्या अटकनेतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. एक संजय तो गया दुसरा जल्द ….' अस ट्विट मध्ये म्हटले आहे. 'एनएसईएल घोटाळ्यातील हिमालयीन बाबा संजय पांडेच आहे का?' 'मला दिलेली कामगिरी फत्ते झाली', असही वक्तव्यं मोहित कंबोज यांनी ट्विटसच्या माध्यमातून केलं आहे. त्यामुळे संजय पांडे यांचे प्रकरण बाहेर काढण्यामागे मोहित कंबोज यांनी पडद्यामागून हालाचाली केल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अनेकदा मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने मोहित कंबोज यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे आता कंबोज यांचे हे ट्विट संजय राऊतांसाठी इशारा असल्याचे बोलले जात आहे. संजय पांडे यांना अटक झाल्यानंतर लगेच संजय राऊत यांनाही ईडीचंं समन्स आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) पुन्हा एकदा समन्स बजावला आहे संजय राऊत यांची या आधीही ईडीने चौकशी केली आहे. या याच प्रकरणी ईडीने आज संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची सहा तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र, आता राऊतांना नोटीस बजावली असून आज चौकशीसाठी बोलावले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.