निवडणुक आयोगाचा मुंबई महापालिकेत शिवसेनेला दणका 

एका वाक्‍याने पोट निवडणुकजातप्रमाणपत्र अवैद्य ठरल्यामुळे मुलतानी यांचे नगरसेवक पद लघुवाद न्यायालयाने रद्द केले आहे.सहसा नगरसेवकाला अपात्र ठरवताना लघुवाद न्यायालयात निकालपत्रात ' या नगरसेवकाचे पद रद्द झाले असून त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला नगरसेवक जाहीर करावे ' असा शेरा देते.अशा वेळी दुसऱ्या क्रमाकांच्या उमेदवाराची महापालिकेच्या निवडणुक विभागा मार्फत जाहीर केली जाते.मात्र,काही वेळा 'या नगरसेवकाचे पद रद्द करण्यात येत आहे. ' फक्त असाच शेरा मानला जातो.अशा वेळी त्या प्रभागात पोट निवडणुक घेतली जाते.राजू पेडणेकर यांच्या बाबतही असाच प्रकार झाला असावा असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
mumbai-mahapalika
mumbai-mahapalika

मुंबई : जोगेश्‍वरी येथील प्रभाग क्रमांक 62 मधील अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर त्याजागी शिवसेनेचे राजू पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून निवड होण्याची शक्‍यता होती.

मात्र,राज्य निवडणुक आयोगाने या प्रभागात पोट निवडणुक जाहीर केल्यामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.या प्रभाग क्रमांक 62 बरोबरच प्रभाग क्रमांक 21 मध्ये 13 डिसेंबर रोजी पोट निवडणुक होणार असून 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. 

महानगरपालिकेत शिवसेना भाजप मध्ये संख्याबळावरुन चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. चंगेच मुलताना यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यावर आता पर्यंतच्या पध्दती प्रमाणे पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून निवड जाहीर झाल्यास संख्याबळ एक सदस्याने वाढण्याची अशा शिवसेनेला होती. 

आतापर्यंतच्या पध्दती प्रमाणे एखाद्या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द झाल्यावर त्याजागेवर दुसऱ्या क्रमाकांच्या उमेदवाराची नगरसेवक म्हणुन निवड जाहीर केली जाते.

मात्र, निवडणुक आयोगाने आज 62 प्रभागात पोट निवडणुक जाहीर केली आहे.त्यामुळे शिवसेनेच्या स्वप्नाला सुरुंग लागला आहे. माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चारकोप येथील प्रभाग क्रमांक 21 मध्येही याच दिवशी पोटनिवडणुक होणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com