उल्हासनगरातील माजी महापौरांसह 10 नगरसेविकांना नोटिस

उल्हासनगरातील माजी महापौरांसह 10 नगरसेविकांना नोटिस

उल्हासनगर,ता,11-नोव्हेंबर 2019 मध्ये पार पडलेल्या महापौर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याऐवजी क्रॉस वोटिंग करून शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करणाऱ्या आणि पक्षाचा व्हिप झुगारणाऱ्या 10 नगरसेविकांना कोकण आयुक्तांनी नोटिस बजावली आहे.

यात भाजपाच्या माजी महापौर पंचम कालानी यांच्या सोबत 9 नगरसेविका तसेच साईपक्षाच्या एका नगरसेविकेचा समावेश आहे. त्यांना 24 जानेवारी रोजी हाजिर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

22 नोव्हेंबर 2019 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर निवडणूक होती.विजयासाठी पुरेसे संख्याबळ असणारे भाजपा-साईपक्षाचे जीवन इदनानी आणि शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांच्यात लढत होती.भाजपाचे गटनेते जमनादास पुरस्वानी यांनी जीवन इदनानी यांनाच मतदान करण्याचा व्हिप पक्षातील नगरसेवक-नगरसेविकांना बजावला होता.तर महापौर पदाचे उमेदवार असणारे साईपक्षाचे जीवन इदनानी हे गटनेते असल्याने त्यांनी देखील व्हिप काढला होता.

मात्र या व्हिपचे उल्लंघन करून भाजपा मधील टीम ओमी कालानी मधील पंचम कालानी, शुभांगीनी निकम, दीपा पंजाबी,छाया चक्रवर्ती,रेखा ठाकुर,डिंपल ठाकुर, सविता गायकवाड, आशा बिराडे,आणि साईपक्षाच्या सविता तोरणे-रगडे यांनी शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांना मतदान केल्याने अवघ्या अडीच वर्षातच भाजपा-साईपक्षावर सत्ताउतार होण्याची नामुश्की ओढवली होती.

पक्षाचा व्हिप झुगारुन बंडखोरी केल्याप्रकरणी भाजपा गटनेते जमनादास पुरस्वानी यांनी नगरसेविकेंची आणि साईपक्षाचे जीवन इदनानी यांनी नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांची 30 डिसेंबर रोजी कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार कोकण आयुक्तांनी 10 नगरसेविकांना नोटिसा बजावून 24 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात टीम ओमी कालानी यांचे प्रवक्ते कमलेश निकम यांच्याशी संपर्क साधला असता,24 तारखेच्या पूर्वि ओमी कालानी हे योग्य ति भूमिका समाज माध्यमां समोर मांडतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com