शेतकरी मेटाकुटिला : मालाला भाव मिळेना आणि खतांची दरवाढ थांबेना....

गेल्या दोन दिवसांपासून सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ झाल्याचा निर्णय झाल्याने याबाबत कृषी केंद्र चालकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Farmers are upset: commodities are not getting prices and fertilizer prices are not going down ....
Farmers are upset: commodities are not getting prices and fertilizer prices are not going down ....

पाळधी (ता. धरणगाव) : खरीप हंगाम सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही, असे सांगूनही भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट आल्याने जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करावा लागला. त्यात कोरोना काळात शेती उत्पन्नात आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यातच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड सद्य:स्थितीत सुरू आहे. 

यंदा खरीप हंगामात केंद्र सरकारकडून रासायनिक खतांची भाववाढ होईल की नाही, याबाबत व्यापारी वर्गापासून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत होती. त्यात ही चर्चा सुरू असताना खरीप हंगाम सुरू होण्यासाठी ‘इफ्को’ या कंपनीने ७ एप्रिल २०२१ ला खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी इफ्को कंपनीचे एम.डी. डॉ. यू. एस. अवस्थी यांनी आठ एप्रिलला ट्विट करून इफ्कोकडून ११.२६ लाख टन खते शेतकऱ्यांना मागील दरातच दिली जातील, असे सांगितले.

त्याचप्रमाणे केमिकल व फर्टिलायझर्सचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किमतीत कुठल्याही प्रकारे वाढ होणार नसल्याने सर्व
खत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच त्याबाबत माहितीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे खतांच्या किमतीत वाढ होणार नाही, हे निश्‍चित झाल्यानंतरही गेल्या दोन दिवसांपासून सर्व खत कंपन्यांकडून भाववाढ झाल्याचा निर्णय झाल्याने याबाबत कृषी केंद्र चालकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

एकिकडे 'इफ्को'चे एमडी पत्रक काढून आणि केंद्रीय मंत्री व्हिडिओ प्रसारित करून भाववाढ होणार नाही, असे सांगतात आणि लगेच भाववाढ जाहीर होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी केंद्रचालक संभ्रमात आहेत. केंद्र सरकारला संघटनेकडून विनंती आहे, की कोरोनामुळे शेतमालाला भाव नसल्यामुळे आपण त्यांचे अनुदान वाढवावे म्हणजे खतांची भाववाढ कमी होईल व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

- विनोद तराळ-पाटील (अध्यक्ष, माफदा, पुणे)


रासायनिक खतांचे जुने व नवीन दर....
खतांचा प्रकार………….जुने दर……….नवीन दर

इफको :

१०:२६:२६.........……...११७५............१७७५

१२:३२:१६...............…..११९०......….१८००

२०:२०:०...……………. ९७५......…...१३५०

डीएपी.....................…..११८५......…..१९००

आयपीएल
१०:२६:२६.............१२००........१९००

२०:२०:०...............९७५.......१४००

पोटॅश..................८५०......…...१०००

महाधन

१०:२६:२६.........…........१२७५......…...१९२५
(स्मार्टटेक)

२४:२४:०..................….१३५०.........…१९००

२०:२०:०:१३............…...१०५०......…...१६००

जीएसएफसी (सरदार)

१०:२६:२६............……..११७५.........….१७७५

१२:३२:१६.....................११९०.........…...१८००

२०:२०:०:१३..................१०००............….१३५०

डीएपी.....................…...१२००............…..१९००

सुपर फॉस्फेट.....................३७०............…...४७०
(पावडर)

सुपर फॉस्फेट...............…...४००....................५००
(दाणेदार)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com