'माझ्या कुटुंबीयांची संपत्ती शोधाच'; मलिकांचे खुले आव्हान

भाजप नेते मोहित कंबोज यांनी आपण नवाब मलिकांवर शंभर कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला होता
NawabMalik- Mohit Kamboj
NawabMalik- Mohit Kamboj

मुंबई : "मी भंगारवाला आहे. चोर नाही. बँक बुडवून मी कोट्यवधी खाल्ले नाही. माझ्या कुटुंबीयांची संपत्ती कुठे कुठे ते तुम्ही शोधाच,मी घाबरत नाही," अशा शब्दात गोंदियाचे पालकमंत्री व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपच्या मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांच्यावर पलटवार केला आहे.

मोहित कंबोज यांनी शनिवारी (३० ऑक्टोबर) नवाब मलिकांची संपत्ती उघड करणार असल्याचा इशारा दिला होता. त्याला गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत मलिकांनी सडेतोड उत्तर दिले. '' आधी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंचे (Sameer Wanakhede) कोणाकोणाशी संबंध, ते हॉटेलवर कसे गेले, मग हॉटेलमधून क्रुझवर ड्रग्ज कसे गेले ते माहीत होईल. आम्ही आता कुठे नाव घ्यायला सुरुवात केली आहे,'' असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

NawabMalik- Mohit Kamboj
भंगार विक्रेत्या मलिकांवर शंभर कोटीचा दावा ठोकणार : मोहित कंम्बोज संतापले

मलिक म्हणाले की, एनसीबीने कारवाईची जी छायाचित्रे शेअर केली ती क्रुझवरील नसून एनसीबी कार्यालयातील आहेत. समीर वानखेडेंनी खोटया कारवाया केल्या. वानखेडेंनी स्वत:ची खासगी आर्मी तयार करून या निष्पाप लोकांना यामध्ये फसवले आहे. समीर वानखेडेंच्या सोबत काशिफ खान हासुद्धा या कटात समील होता. आता लवकरच काशिफ खान याच्याविरुद्ध आपण पुरावे सुद्धा देणार असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले.

दरम्यान २ ऑक्टोबरला क्रुझवर झालेल्या कारवाईत, भाजपचे नेते मोहित कंम्बोज यांचा मेव्हणा ऋषभ सचदेवा यालाही एनसीबीनं ताब्यात घेतले होते. पण त्याला नंतर सोडून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण देत नवाब मलिकांवर आरोप केले होते. एनसीबीच्या कारवाईत काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. पण माझ्याकडे पक्षाचं कोणतंही पद नाही, ऋषभ सचदेवा माझा मेव्हणा आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबध आहे, याचे पुरावे नवाब मलिकांनी द्यावे, असे म्हणत मोहित कंबोज यांनी उलट नवाब मलिकांवरच आरोप केले.

''नवाब मलिक खुर्चीचा गैरवापर करीत आहेत. ते कचऱ्याचा धंदा करतात, त्यांनी कचरा फेकून द्यावा. त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहेत. त्यांच्यावर मी शंभर कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार आहे,'' असे मोहित कंबोज यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com