वनसमिती माजी अध्यक्षाचा कार्यालयात धिंगाणा; खूर्ची फेकून देत चपलाही भिरकावल्या 

वन अधिकारी यांनी थोड्यावेळात लेखी स्वरूपात माहिती मिळले असे, माळी यांना सांगितले. तसेच माहिती तयार करून दिली. त्यांनी ती माहिती पाहून सदरचा माहितीचा कागद वन अधिकाऱ्यांच्या अंगावर भिरकावला. दरम्यान आपणास दिलेली माहिती योग्य वाटत नसेल. तर तुम्ही वरिष्ठ कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्या, असे वन अधिकारी यांनी सांगितले.
Former chairman of the forest committee stormed the office of the forest department
Former chairman of the forest committee stormed the office of the forest department

कातरखटाव : कलेढोण (ता. खटाव) येथील माजी वन समितीच्या अध्यक्षाने वडूज वनविभागाच्या कार्यालयात धिंगाणा घातला. तुमचे वरिष्ठ बाजीराव लागून गेलेत का? त्यांना इथे बोलवा. मी इथून जाणार नाही, मी येथेच झोपणार आहे. तुम्हाला लई मस्ती आलीय, असे अर्वाच्च्य भाषेत बोलून कार्यालयातील खूर्ची फेकून देऊन पायातील चपला वनपरिक्षेत्र अधिकारी शितल फुंदे यांच्या दिशेने फेकून मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच माहिती घेतल्याशिवाय इथून जाणार नाही, अशी त्याने दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी वडूज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कलेढोण (ता. खटाव) येथील तुळशीराम शंकर माळी असे या माजी वनसमिती अध्यक्षाचे नाव आहे.

याबाबत वडूज पोलिस ठाण्यातून मिळलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार (ता. 12)  दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कलेढोण (ता. खटाव) येथील तुळशीराम शंकर माळी याने वनविभागाच्या कार्यालयात येऊन येथील वन अधिकारी यांना आपण दिलेल्या अर्जाची माहिती मला कधी देणार असे विचारले.

त्यावर वन अधिकारी यांनी थोड्यावेळात लेखी स्वरूपात माहिती मिळले असे, माळी यांना सांगितले. तसेच माहिती तयार करून दिली. त्यांनी ती माहिती पाहून सदरचा माहितीचा कागद वन अधिकाऱ्यांच्या अंगावर भिरकावला. दरम्यान आपणास दिलेली माहिती योग्य वाटत नसेल. तर तुम्ही वरिष्ठ कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्या, असे वन अधिकारी यांनी सांगितले.

त्यावर श्री. माळी यांनी तुमचे वरिष्ठ बाजीराव लागून गेलेत का ? त्यांना इथे बोलवा. मी इथून जाणार नाही, मी येथेच झोपणार आहे. तुम्हाला लई मस्ती आली आहे, असे अर्वाच्य भाषेत बोलून कार्यालयाची खुर्ची फेकून देऊन पायातील चपला अधिकाऱ्यांच्या दिशेने फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच माहिती घेतल्याशिवाय इथून जाणार नाही, अशी धमकी माळी याने दिली.

तसेच यापूर्वी सुद्धा माळी याने वनविभागातील कर्मचाऱ्यांना काही कारण नसताना वेळोवेळी त्रास दिला आहे. या घटनेची फिर्याद खटाव तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वडूज शितल फुंदे यांनी दिली. याबाबत तुळशीराम माळी याच्यावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com