त्या नगरसेवकांची टांगती तलवार कायम 

मुंबई : मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांच्या पात्रते बाबात 17 मे रोजी कोकण आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे.पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा अर्ज मनसेने कोकण आयुक्तांकडे केला होता.
MNS LoGo
MNS LoGo

 मुंबई : मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांच्या पात्रते बाबात 17 मे रोजी कोकण आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे.पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा अर्ज मनसेने कोकण आयुक्तांकडे केला होता. 

तत्कालीन गटनेते दिलीप लांडे यांच्यासह सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.या प्रवेशाला आव्हान देत नगरसेवकांना शिवसेनेच्या गटाबरोबर नोंदणी करण्याची परवानगी देऊ नये तसेच पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत त्यांचे सदस्यत्व रद्द करावे असे दोन अर्ज कोकण विभागीाय आयुक्तांकडे करण्यात आले  होते .

यातील गट नोंदणीच्या आक्षेपचा अर्ज फेटाळून लावत जानेवारी महिन्यात कोकण आयुक्तांनी गटनोंदणीला परवानगी दिली.त्यानुसार या नगरसेवकांचा शिवसेनेत कायदेशीर प्रवेश झाला.त्यानंतर दिलीप लांडे यांना सुधार समिती सारख्या महत्वाच्या समितीचे अध्यक्ष पद मिळाले.मात्र,त्यांच्यावरील धोका अद्याप टळलेला नाही. 

या सहा नगरसेवकांच्या अपात्रतेच्या अर्जावर 17 मे रोजी सकाळी 11 वाजता कोकण आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे.लांडे यांच्यासह अश्‍विनी माटेकर,परमेश्‍वर कदम,दत्ता नरवणकर,डॉ.अर्चना भालेराव,हर्षला मोरे या नगरसेवकांचा सहभाग आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com