Gopinath Munde Birthday: '' हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय..., अप्पा..'' ; धनंजय मुंडेंचं भावनिक टि्वट

Dhananjay Munde : तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता
Dhananjay Munde , Gopinath Munde
Dhananjay Munde , Gopinath MundeSarkarnama

Gopinath Munde Birthday : गोपीनाथ गडावर येवू नका, गड घरोघरी पोहचवा, तिथेच जंयती साजरी करा..भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील भावनिक टि्वट केलं आहे. धनंजय मुंढे यांनी हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...' अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय.. अशा शब्दांत धनंजय मुंडे( Dhananjay Munde) यांनी भावनिक साद घातली आहे.

Dhananjay Munde , Gopinath Munde
Pankaja Munde : गोपीनाथ गडावर येवू नका, गड घरोघरी पोहचवा, तिथेच जंयती साजरी करा..

भाजप नेत्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत.तसेच दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरु असतात. मात्र, तरीदेखील धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला व स्मृती दिनाला त्यांच्या आठवणींना उजाळा देतानाच त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर जात असतात. यावर्षी देखील धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भावनिक टि्वट केलं आहे.

या टि्वटमध्ये धनंजय मुंढे म्हणतात, हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...' अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून!विनम्र अभिवादन अप्पा... असेही मुंडे टि्वटमध्ये म्हणाले आहेत.

Dhananjay Munde , Gopinath Munde
Anil Deshmukh :.. तर अनिल देशमुख तेरा महिने तेरा दिवसांनी बाहेर येतील.. !

पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाल्या...

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदा गोपीनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. पण प्रत्येकजण गोपीनाथ गडावर पोहचू शकत नाही. गोपीनाथ गड प्रत्यक्ष गावागावात घेऊन जा, परिसरात घेऊन जा. वॉर्ड, ग्रामपंचायत, गल्ली बोळात जयंतीचा कार्यक्रम साजरा करा. सोशल मिडियाच्या माध्यामातून आपण जोडले जाऊ आणि मुंडे साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम घराघरात पोहचवू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com