मुंबई : सरकार उद्धव ठाकरे यांचे मात्र सरकारच्या अधिकृत कॅलेंडरवर माहिती आणि फोटो छापण्यात आले आहेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे.
या कॅलेंडरने सत्ताधारी चांगलेच संतप्त झाले आहे. ज्या अधिकाऱ्याने ही चूक केली आहे त्या अधिकाऱ्यांकडून त्याचा खर्च वसूल केला जाईल असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.
राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी नवीन कॅलेंडर प्रकाशित केल जातं. त्यात सरकारची सर्व माहिती असते. मात्र उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर ही फडणवीस सरकारची माहिती आणि फोटो त्यात छापण्यात याले आहेत.फडणवीस म्हणायचे मी पुन्हा येईल, कदाचित त्या अधिकाऱ्यांना ही तो आत्मविश्वस असेल म्हणून त्यांनी छापले असतील. संबंधित अधिकाऱ्यांकडून हा खर्च वसूल केला जाईल अस जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.