दाऊदचा पत्ता लागला; भाच्यानंच केला भांडाफोड अन् मलिकांच्याही अडचणी वाढल्या

दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकर याने काही दिवसांपूर्वी ईडीला जबाब दिला आहे.
Dawood Ibrahim Latest Marathi News
Dawood Ibrahim Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून तपास यंत्रणा शोध घेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पत्ता लागला आहे. तो पाकिस्तानची राजधानी कराचीमध्येच असल्याची माहिती त्याच्या भाच्यानेच दिली आहे. तसेच आई हसिना पारकर व मनी लाँर्डिंगच्या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील व्यवहाराची माहिती त्याने दिली आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. (Dawood Ibrahim Latest Marathi News)

दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकर (Alishah Parkar) याने काही दिवसांपूर्वी ईडीला जबाब दिला आहे. मनी लाँर्डिंग प्रकरणात दिलेल्या जबाबामध्ये त्याने ही माहिती दिली आहे. दाऊद हा कराचीतच असल्याचे त्याने म्हटलं आहे. ईद तसेच दिवालीच्या सणांना दाऊदसह त्याची पत्नी महजबिन ही माझी पत्नी आयशा व माझ्या बहिणीशी संपर्क करतात, असा धक्कादायक खुलासाही त्याने केला आहे. (Dawood ibrahim In karachi)

Dawood Ibrahim Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा, पुढे काय करायचं ते ठरलंय! संभाजीराजेंच्या गुगलीनं उत्सुकता शिगेला

कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा काही भाग आई हसीना पारकरने नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासाही अलीशाहने केल्याचे समजते. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढू शकतात. याच प्रकरणी ईडीने मलिकांना अटक केली आहे. सध्या त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे.

अलीशाहने काय दिलाय जबाब?

दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर त्याची सर्व मालमत्ता आणि व्यवसाय हसीना पारकर ही संभाळायची. यातील बहुतांश मालमत्ता आजीच्या नावावर होत्या. सलीम पटेल, खालीद आणि शमिन हे हसीना पारकरसाठी काम करायचे. त्यावेळी आई हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंगचा वाद मिटवला होता. तिथे ऑफिस सुरू करण्यात आलं आणि कंपाऊंडच्या काही भागावर ताबा मिळवला गेल्याचे अलीशाह याने सांगितलं आहे.

जागेचा नेमका काय वाद होता माहिती नसल्याचे सांगत अलीशाहने आई हसीना पारकरने यातील तिचा भाग हा मलिक यांना विकला, असं स्पष्ट केलं आहे. अलीशाहचा हा जबाब ईडीकडून पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणातील मलिकांच्या अडचणी वाढू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com