अमित राज ठाकरेंच्या लग्नाला यायचंय बरं का!

पडद्यामागील घडामोडी टिपणारी`कानोजी` यांची ही मुलुखगिरी वाचायलाच हवी!
अमित राज ठाकरेंच्या लग्नाला यायचंय बरं का!

लग्नसराईच्या मोसमात ठाकरे परिवारातही सनई चौघडे वाजणार आहेत.ठाकरे बंधुंची मुले आता लग्नाच्या वयात आली आहेत. स्मिता ठाकरेंच्या एका मुलाचे लग्न झाले. स्व.बिंदूमाधव आणि माधवी ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात यजमान पित्याची भूमिका दिवंगत भावाचे नसणे हलके करण्यासाठी राज ठाकरे यांनी मन:पूर्वक .निभावली.

स्व.बाळासाहेब ठाकरेंनीही याबददल त्यांचे कौतुक केले होते. युवा सेनेचे अध्यक्ष मितभाषी, संयत आदित्य ठाकरे यांचे नाव आजकाल कुणाकुणाशी जोडले जात असते.खरे तर ते अत्यंत सोज्वळ. त्यामुळे अर्थातच अनेक बडे वधूपिते त्यांच्यावर नजर ठेवून असणार. ती खरी भाग्यवान कोण, हे अदयाप त्यांनी ठरवलेले दिसत नाही पण धाकटया पातीने मात्र आघाडी घेतली आहे.

अमित राज ठाकरे यांचा विवाह 27 जानेवारीला होणार आहे. कर्करोगाशी झुंज दयावी लागलेल्या अमित यांची साथ त्यांची मैत्रिण मिताली बोरूडे हिने सोडली नाही. ती आजाराच्या काळात समवेत होती. त्या काळात कमालीचे भावूक झालेले राज लग्नाची आमंत्रणे देण्यासाठी स्वत: त्यांच्या संबंधातील सर्वांची व्यक्तिगत भेट घेत आहेत. नाशकातील सप्तशृंगीदेवीच्या चरणी पत्रिका ठेवल्यावर राज यांनी मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या सिध्दीविनायकालाही पत्नी शर्मिलासह भेट दिली. नंतरपतीपत्नी  थेट गेले ते उदयोगपती रतन टाटा यांच्याकडे. मातोश्रीवर राज एकटेच आमंत्रण देण्यासाठी गेले.

मुंबईतील कोणत्याही महत्वाच्या अधिकाऱ्याला भेटा तो आवर्जून उल्लेख करतो आहे तो राज ठाकरे यांनी दिलेल्या स्नेहपूर्ण आमंत्रणाचा! दोस्ती निभावण्यात राज कायम आघाडीवर असतात. राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळी असे ते आवर्जून सांगतात. त्यात यांचे कोणतेही आयोजन रेखीव ,देखणे. त्यामुळे लग्नाबददल सर्व निमंत्रितांनाच काय अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

राज यांचे व्याही हे देखील एक आसामी आहेत. डॉ.संजय बोरूडे आहेत शल्यचिकित्सक. पोटावरील शस्त्रक्रियांत त्यांचा हातखंडा आहे. केवळ दोन दिवसांपूर्वी त्यांना बालमेद रोखण्याच्या मोहिमेचे प्रमुख नेमत आरोग्यशिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी सरकारी सोयरीक जोडली आहे. आजाराशी धैर्याने सामना करणाऱ्या आणि त्यात साथ देणाऱ्या अमित आणि मितालीला शुभेच्छा.राजसाहेबांच्या या आनंदात कानोजीसह संपूर्ण महाराष्ट्र सामील आहे. नांदा सौख्यभरे!! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com