पुण्यातील प्रमुख खासगी रूग्णालयांत अनियमितता; विधीमंडळाच्या समितीचे ताशेरे

समितीने पुणे जिल्ह्यातील जहांगीर,रुबी,दीनानाथ मंगेशाकर,सह्याद्री ,संचेती,के.ई.एम. व इन्ल्याक्स अँड बुधराणी या धर्मादाय खासगी रूग्णालयाला भेटी दिल्या.
Pune Private Hospital
Pune Private HospitalSarkarnama

मुंबई : पुण्यातील जहांगीर,संचेती,के.ई.एम. या मोठ्या रूग्णालयांमध्ये अनियमितता आढळून आल्याचे निरीक्षण राज्य सरकारने नेमलेल्या तदर्थ संयुक्त समितीने नोंदवले आहे.याबाबतचा समितीचा अहवाल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला.

मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १९५० च्या अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांना सरकारतर्फे सवलत देण्यात येते. यामध्ये शुश्रुषालय,प्रसुतिगृह दवाखाने,वैद्यकीय सहाय्यासाठीचे केंद्र यांचा समावेश होतो. ही समिती सरकारकडून देणारी सवलत,मदत,सूट,माफी,आर्थिक व दुर्बल घटकांना राखीव ठेवलेले अधिकार याची तपासणी करून सरकारला शिफारशी करण्यासाठी स्थापन केलेली आहे.

Pune Private Hospital
...ही तर पूर्व हवेली तालुक्याच्या निर्मितीची नांदी

या समितीने ४ व ५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुणे येथे धर्मादाय रूग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर या समितीच्या एकूण तीन बैठका झाल्या.त्यानंतर ७ मार्च २०२२ रोजी झालेल्या अंतिम बैठकीत प्रारूप अहवाल विचारात घेऊन तो संमत केला आहे.या समितीच्या प्रमुख विधी व न्याय मंत्री आदिती तटकरे आहेत. दोन्ही सभागृहातील सर्वपक्षीय आमदार या समितीचे सदस्य आहेत.

समितीने पुणे जिल्ह्यातील जहांगीर,रुबी,दीनानाथ मंगेशाकर,सह्याद्री ,संचेती,के.ई.एम. व इन्ल्याक्स अँड बुधराणी या धर्मादाय खासगी रूग्णालयाला भेटी दिल्या. समितीने जहांगीर नर्सिंग होमला भेट दिली. रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ गरीब व दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत उपचार होतो याचा फलक आढळला नाही.सदरचा फलक बाहेरच्या बाजूला छोट्या आकारात लावण्यात आला होता. हा फलक प्रतिक्षा कक्षात लावणे आवश्यक असताना तसा लावला नाही. याचबरोबर रूग्ण आय.पी.एफ.चा किंवा इ.डब्ल्यू.एस.चा असल्याची माहिती तसेच त्याचे नाव फलकावर लावणे.तसेच अशा रूग्णाकडून कोणतीही अनामत घेऊ नये,अशी सूचना समितीने केली.

Pune Private Hospital
सत्ताधारी भाजपासमोर राष्ट्रवादीचे शेवटच्या दिवशीदेखील लोटांगण !

समितीने रुबी रूग्णालयाला भेट दिली व रुग्णांशी चर्चा केली असता असे समितीला समजले की,एका रूग्णाकडे केशरी रंगाचे रेशधकार्ड असल्यामुळे त्याच्यावर मोफत उपचार करावेत असे पत्र दिले होते तरी या रुग्णाला दाखल केले नाही.तसेच या रुग्णांच्या नातेवाईकांकडून १० हजार अनामत रक्कम घेतली.

समितीने संचेती,सह्याद्री या हाँस्पिटलला भेटी दिल्या.या दोन्ही ठिकाणी आर्थिक व दुर्बल घटकांबाबतचे फलक दर्शानी भागात लावले नव्हते.या ठिकाणी समज दिले.आयपीएफ व ईडब्ल्यूएस या वर्गातील रुग्णांच्या खाटा किती,किती रूग्णांवर उपचार सुरू आहेत,याची माहिती के.ई.एम.हाँस्पिटलला समितीला सांगता आले नाही.

अर्थिक व दुर्बल घटकातील रूग्णाबाबत भेदभाव न करता सर्वांना सारखाच उपचार झाला पाहिजे.उपचार करताना हलगर्जी झाली आणी तशी तक्रार आली तर संबंधितावर कडक कारवाई करावी.प्रत्येक रूग्णालयात आय.पी.एफ.चे खाते उघडून २ टक्के रक्कम भरणा करावी.त्याचा तपशील प्रत्येक धर्मादाय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी तपासावा.अशी प्रमुख शिफारस या समितीने केली असून या कारवाईची माहिती समितीला तीन महिन्यांत पाठविण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com