केईएम अधिष्ठात्यांचे निवासस्थान भूतबंगला झालेय का ? 

अधिष्ठाता निवास हा भूतबंगल आहे, असे मी मानत नाही. सध्या राहत असलेल्या घरापासून केईएम रुग्णालयात पाच मिनिटांत चालत जाता येते. अधिष्ठाता पदासह केईएममधील रेडिओलॉजी विभागाचे प्रमुखपदाचा कार्यभार तसेच ऑर्थोपॅडीक सेंटर येथेही येणे जाणे असते. त्यासाठी आताचे घर जास्त योग्य आहे.-डॉ. हेमंत देशमुख, नवनियुक्त अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
KEM-dean-
KEM-dean-

मुंबई     : परळ येथील हाफकिन कार्यालयासमोर मोठ्या दिमाखात वसलेल्या केईएम अधिष्ठाता बंगल्यात राहण्यास नव्याने अधिष्ठाता पदाचे पदभार स्विकारलेल्या डॉ हेमंत देशमुख यांनी नकार दिला आहे.

या अधिष्ठाता निवासात राहण्यास नकार देणारे डॉ हेमंत देशमुख हे पाचवे अधिष्ठाता ठरले आहेत. हा बंगला भूतबंगला असून, या बंगल्यात राहायला जाणारा अधिष्ठाता पदावर जास्त काळ टिकत नाही, असा समज केईएम वर्तुळात आहे.

परळ येथील केईएम या पालिका रुग्णालयाला बुधवारी नवे अधिष्ठाता मिळाले. परंतु अधिष्ठाता निवासाबाबत असलेल्या अफवांबाबत नव्याने नियुक्त झालेल्या डॉ हेमंत देशमुख यांनीही राहण्यास नकार दिल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. 

केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ संजय ओक हे त्या बनल्यात राहणारे शेवटचे अधिष्ठाता ठरले. त्यांच्या कारकिर्दीत रुग्णालयातील प्रस्तावित दोन एमआरआय मशीनबाबद वाद निर्माण झाला. या वादानंतर डॉ ओक यांनी 23 वर्षांच्या कारकिर्दीनंतर राजीनामा दिला. या वादावर त्यांना पालिकेकडून नंतर क्‍लिनचीटही मिळाली. 

ओक यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्त झालेलेल केईएमचे अधिष्ठाता डॉ मुरारी येवलेकर यांनी अधिष्ठाता निवासात राहायला नकार दिला. डॉ येवलेकर सायन येथील निवासस्थानातच राहणे पसंत केले. परंतु त्यांच्यावर गरीब रुग्ण निधीतील दोन कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अडकले. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दोन कोटीच्या घोटाळ्यात त्यांना दोषी मानले गेले.

यानंतर डॉ संध्या कामत यांनी केईएमच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे स्विकारली. त्यांनी आजारपणामुळे दोन वर्षानंतर अधिष्ठाता पदाचा राजीनामा दिला. डॉ कामत पेडर रोडयेथील निवासस्थानातून केईएमला ये-जा करत होत्या.

 त्यानंतर प्रभारी अधिष्ठाता पदी डॉ शुभांगी पारकर यांनी कार्यभार स्विकारला. परंतु वयोवृद्द पालक आणि अगोदरपासूनच केईएम संकुलात राहत असल्याने त्यांनी अधिष्ठाता बंगल्यात राहणे नाकारले. पारकर यांनी मानसोपचारतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख  होत्या . त्यांनीही  अधिष्ठाता पद वर्षभरातच सोडले.

 त्यावेळी वर्षभरापासून टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरील डॉ अविनाश सुपे यांनी तातडीने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे स्विकारली. मात्र चेंबूरमधील निवासस्थानच आपल्याला योग्य असल्याचे सांगत डॉ सुपे यांनीही अधिष्ठाता निवासात राहणे पसंत केले नाही. डॉ सुपेनंतर डॉ देशमुख यांची अधिष्ठाता पदावर नियुक्ती झाली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com