पवारांबद्दलच्या मतावर ठाम! पोस्ट डिलीट करणार नाही : केतकी चितळेने स्पष्टच सांगितले

Ketaki Chitale | Sharad Pawar : अभिनेत्री केतकी चितळेने वादग्रस्त पोस्ट करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गरळ ओकली आहे.
Ketaki Chitale
Ketaki Chitale Sarkarnama

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पोस्टप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ठाणे आणि पुण्यामध्ये त तक्रार दाखल केली होती. या तक्रारीरींच्या आधारे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी तिला अटक देखील केली आहे. (Ketaki Chitale Latest Marathi News)

यानंतर आज रविवारी तिला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान केतकीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील घेतला नाही. तिने स्वत:च न्यायालयात बाजू मांडली. ती म्हणाली, मी त्या मतांवर ठाम असून मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही, मला बोलण्याचं, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी ती पोस्ट स्वत: लिहिली नाही. मी ती कुठूनतरी कॉपी केली आहे. पण ती स्वखुशीनं पोस्ट केली असल्याचेही केतकीनं तिने स्पष्ट केले. (Ketaki Chitale in Police Custody)

Ketaki Chitale
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केतकी चितळेचे कान टोचले!

दरम्यान केतकीने एका वकिलाची शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियात शेअर केली. पण पोस्टमध्ये अतिशय आपत्तीजनक अशा टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. पोस्टमधील भाषेचा आणि वक्तव्यांचा सोशल मीडियातून अनेक नेटकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील केतकीवर संताप व्यक्त केला आहे.

Ketaki Chitale
केतकी चितळे विरोधात शिवसेनेनेही बाह्या सरसावल्या!

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,'' अशा शब्दांत राज यांनी सुनावले आहे.

Ketaki Chitale
केतकी चितळेवरचा राग आंबेकरांवर निघाला... राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन लगावल्या...

दरम्यान, केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com