दोन वर्षात ठाकरे सरकारचं दबाव, दडपशाहीचं राजकारण !

''महाविकास आघाडीच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात दबावाच आणि दडपशाहीच राजकारण वाढल्याची टीका आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik) यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
Ganesh Naik, Uddhav Thackeray
Ganesh Naik, Uddhav Thackeraysarkarnama

नवी मुंबई : महाविकास आघाडी सरकारला (Thackeray government) नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला आहे. तर विरोधी पक्ष भाजपनं आघाडी सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करुन जोरदार प्रहार केला आहे.

''महाविकास आघाडीच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात दबावाच आणि दडपशाहीच राजकारण वाढल्याची टीका आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik) यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

''विकासकामांचा बट्ट्याबोळ झाला असून अनावश्यक कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून करोडो रुपयांचा वायफळ खर्च सुरू असल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला.

''नवी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर अनावश्यक कामे करण्यासाठी दबाव टाकला जातो आहे, वरिष्ठांचे फतवे आणले जात आहेत आणि फोन केले जात असल्याची आरोप नाईक यांनी केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta banarjee) यांनी काल (३० नोव्हेंबर) राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. मात्र आता या भेटीवरुन वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे अन् ममता यांच्यातील बंद दाराआड काय चर्चा झाली, याचा खुलासा करावा, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish shelar) यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या भेटीवर आक्षेप घेत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

Ganesh Naik, Uddhav Thackeray
पंचवीस वर्षांनंतर सेनेला 'जय महाराष्ट्र' करुन दळवी बांधणार 'घड्याळ'

मोदींनी नाकारल्यानंतर दहा मिनिटांत कुंटे बनले मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार !

मुंबई : मुख्य सचिवपदी मुदत वाढ देण्यास सीताराम कुंटे (sitaram kunte) यांना केंद्र सरकारनं नकार दिला. त्यानंतर कुंटे निवृत्त झाले, अन् निवृत्तीनंतर अवध्या दहा मिनिटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कुंटेंना सुखद धक्का दिला. मुख्यमंत्र्यांनी कुंटे यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्र्यांशी कुंटे यांचे जुळलेले ट्यूनिंग अन् कोविडकाळात त्यांनी बजावलेली भूमिका याचे बक्षिस म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजोय मेहता यांच्यानंतर कुंटे यांना प्रधान सल्लागार बनवले असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com