Raj Thackeray News: आमच्या नात्यात कुणीतरी विष कालवल'; उद्धव ठाकरेंबद्दल विचारताच राज ठाकरे भावूक

Raj Thackeray Shared Moments In Khupte Tithe Gupte Show: जुन्या आठवणींना उजाळा देताना राज ठाकरे भावूक
Raj Thackeray on
Raj Thackeray on Sarkarnama

Mumbai News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका शोमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. या शोमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना राज म्हणाले, "खूप छान दिवस होते ते. काय माहित कुणी विष कालवलं, कुणाची नजर लागली ", असं म्हणत ते भावूक झाले.

'खुपते तिथे गुप्ते' हा शो येत्या 4 जून पासून सुरू होत आहे. या शोमध्ये राज ठाकरे सहभागी झाले आहेत. अवधूत गुप्ते यांनी त्यांना या शोमध्ये अनेक प्रश्न विचारले आहेत. यावर राज ठाकरेही दिलखुलास उत्तरं देणार आहेत.

Raj Thackeray on
Karnataka Politics : 'कर्नाटकमध्ये सिद्धरामय्याच पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार; अडीच-अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही'

'खुपते तिथे गुप्ते' शो चा सध्या प्रोमो आला आहे. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे काही फोटो दाखवण्यात आलेत. या फोटोंवर राज यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेला एक फोटोही यावेळी दाखवण्यात आला. यावर अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरेंना विचारलं की, "काय वाटतंय सगळं एकत्र असं बघून?" त्यानंतर राज ठाकरे काही वेळ शांत होत काहीसे भावूक झाल्याचे दिसत आहेत.

अवधूत गुप्ते यांनी या शोमध्ये राज ठाकरे यांना काही फोटो दाखवले. त्या फोटोंकडे बघत राज म्हणाले,"खूप छान दिवस होते ते. काय माहित कुणी विष कालवलं. किंवा कुणाची नजर लागली". त्यानंतर राज यांना गुप्तेंनी दुसरा प्रश्न विचारला. आता पुन्हा एकत्र येऊ शकत नाही? या प्रश्नावर राज ठाकरे काय उत्तर देणार? हे 4 जूनला पूर्ण शो पब्लिश झाल्यावरच पाहायला मिळणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com