मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के, ते पुराव्याशिवाय बोलत नाहीत...

Ashish Shelar|BJP : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता जेलमध्ये जाणार का?
Sanjay Raut, Mohit Kamboj, Ashish Shelar Latest News
Sanjay Raut, Mohit Kamboj, Ashish Shelar Latest Newssarkarnama

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक चर्चेला उधाण आलेले बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) भेटणार, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे. यामुळे देशमुख, मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.

दरम्यान कंबोज यांनी केलेल्या या ट्विटचे समर्थन भाजप नेत्यांकडून करण्यात येत असून भाजप (BJP) नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी कंबोज यांचा स्ट्राईक रेट टक्के आहे. ते पुराव्याशिवाय बोलत नाहीत, अशा शब्दात त्यांनी त्यांना समर्थन दिल आहे. ( Mohit Kamboj, Ashish Shelar Latest News)

Sanjay Raut, Mohit Kamboj, Ashish Shelar Latest News
`मलिक आणि देशमुख यांच्यासोबत राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता जेलमध्ये बसणार`

मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासोबत आर्थर रोड जेलमध्ये असेल, असे ट्विट त्यांनी केले आहे.

यावर बोलतांना शेलार म्हणाले की, मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के आहे. ते पुराव्याशिवाय बोलत नसून ते पूर्ण पुरावा असल्यावरच ते बोलतात. आजपर्यंत त्यांनी पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले आहेत. त्यांचं ट्विट महत्त्वाचं आहे. मात्र, कुणाला तुरुंगात टाकण्याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलणं त्यांनी टाळायला हवं. पण कंबोज यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी तेच केलं असल्यात मत शेलारांनी व्यक्त केलं आहे.

ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी कंबोज यांनी केली. ते नेते आज अटकेत आहेत. यामुळे त्यांच्या या ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. विशष म्हणजे, कंबोज यांनी हे ट्विट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केल्याने याची अधिक चर्चा होत आहे. त्यांचे हे ट्विट विरोधकांवर दबाव निर्माण करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

दरम्यान, कंबोज यांनी पुन्हा एकदा इशारा देऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मी केलेले ट्विट जपून ठेवा, असेही सांगण्यास कंबोज यांनी कमी केले नाही. याबाबत आपण लवकरच पत्रकार परिषद घेणार असून या नेत्याचे कारनामे उघड करणार आहे. यात देश आणि विदेशालील मालमत्तांची यादी, बेनामी कंपन्यांची नावे, मैत्रीणींच्या नावे घेतलेल्या मालमत्ता, विविध खात्यांचा कारभार सांभाळताना केलेला भ्रष्टाचार, कुटुंबाचे उत्पन्न आणि मालमत्तांची यादी असे जाहीर करणार आहे, असे कंबोज यांनी ट्विट करून सांगितले आहे. त्यांच्या या ट्विटखाली मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. कंबोज यांच्या ट्विटचे समर्थन शेलार यांनी केल्याने या आता राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यावर कारवाई होणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com