Suresh Mhatre : 27 गाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी बाळ्या मामा, 'मविआ'चा महायुतीला मोठा दणका

Kalyan Dombivali Municipal Corporation News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरखासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Suresh Mhatre
Suresh MhatreSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 24 Sep : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (Suresh Mhatre) यांच्याकडे 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ही निवड महाविकास आघाडीचा महायुतीला मोठा दणका असल्याचं बोललं जात आहे.

तर अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच एका वर्षाच्या आत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन बाळ्या मामा यांनी समितीला दिलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका लगतची 27 गावं 2015 साली कल्याण-डोंबिवली महापालिकेत (Kalyan Dombivali Municipal Corporation) समाविष्ट करण्यात आली. या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी 27 गाव संघर्ष समितीचा लढा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

या गावांतील 18 गावे वगळून त्यांची नगरपालिका करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. मात्र त्याला समितीने विरोध केला होता. त्यामुळे ह प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर येताच सर्व पक्षीय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्या होत्या.

मुख्यमंत्री आणि खासदारांनी समितीच्या समस्या सोडविण्यासाठी काही निर्णय घेतले असून ते राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे. 27 गावांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्वासन मिळतात, पुढे ठोस पाऊल काही उचलले जात नाही. एकीकडे 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली जातात.

मात्र 27 गावांचा प्रश्न तसाच भिजत पडला आहे. या सर्व गोष्टींमुळे समितीमधील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यातच समितीचे तत्कालीन अध्यक्ष गंगाराम शेलारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून समिती नव्या अध्यक्षाचा शोधात होती.

Suresh Mhatre
Mahayuti News : महायुती एकत्र लढणार की नाही? अमित शहांनी स्पष्टचं सांगितलं

अशातच आता महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जावी यावर सर्वांचे एकमत झाल्यानंतर 23 सप्टेंबरला समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील, अर्जूनबुवा चौधरी यांच्या नेतृत्वात समिती पदाधिकाऱ्यानी खासदार म्हात्रे यांची या संदर्भात भेट घेतली. यानंतर म्हात्रे यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली.

यावर बोलातना चंद्रकांत पाटील म्हणाले, खासदार मात्रेंनी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. जबाबदारी स्वीकारताच त्यांनी एक वर्षाच्या आत गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन दिले आहे. 27 गावांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. समितीला अनेक आश्वासने दिली गेली, मात्र त्यांची पूर्तता झालेली नाहीत, पण आता नवे अध्यक्ष हे प्रश्न सोडवितील अशी आशा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Suresh Mhatre
Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे कायम राहिले असते, तर...' ; फडणवीसांचं वक्तव्य!

गेल्या काही महिन्यांपासून समिती पदाधिकऱ्यामध्ये मतभेद निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. समितीचे पदाधिकारी गुलाब वझे आणि काही पदाधिकाऱ्यांची खासदार शिंदे यांच्याशी जवळीक आहे. तर काही सदस्य हे अन्य पक्षाचे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान समिती आम आदमी पार्टीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.

समिती पदाधिकाऱ्यांच्या या राजकारणाला स्थानिक जनता कंटाळली असून त्यातूनच नवी कार्यकारिणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्षपद महाविकास आघाडीच्या हाती गेल्याने महायुतीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com