Ravindra Waikar Vs Amol Kirtikar : रवींद्र वायकारांचे नशीब फळफळणार? फक्त 75 मतांचे लिड..

Mumbai North West Lok Sabha Election 2024 : आलटून पालटून मताधिक्य घेणाऱ्या लढतीत वायकरांची फक्त 75 मतांनी सरशी
Amol Kirtikar, Ravindra Waikar
Amol Kirtikar, Ravindra WaikarSarkarnama

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ED ग्रस्त असलेले ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाकडून रवींद्र वायकर आखाड्यात आहेत. यांच्यातील लढत अटीतटीची होताना दिसत आहे. कधी कीर्तीकर तर कधी वायकर मताधिक्य घेत असल्याने दोन्ही गटाची धडधड वाढत आहे. सध्या वायकर हे फक्त ७५ मतांनी आघाडीवर आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरेंनी महिनाभर आधीच अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर करुन महायुतीवर डाव टाकला. यानंतर ईडीच्या धाकातून आपल्या गटात ओढलेल्या रवींद्र वायकरांना शिंदेंनी मैदानात उतरवले. त्यांच्या विजयासाठी भाजपच्या मदतीने मोठी यंत्रणा कामाला लावली. मात्र सध्या ही लढत अगदी बरोबरीत आणून ठेवली आहे. आता वायकर आणि कीर्तीकरांच्या मतांमध्ये फक्त ७५ मतांचा फरक आहे. त्यामुळे येथून कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com