क्रिकेट खेळाडूच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत

यापुर्वीही एका भारतीय क्रिकेटरच्या (Indian Cricketer) मुलीवर बलात्कार (Rape) करण्याची धमकी देण्यात आली होती.
Arrest
Arrest Sarkarnama
Published on
Updated on

मुबंई : भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket team) खेळाडूच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. रामनागेश अलीबथिनी असे या आरोपीचे नाव आहे. T-20 विश्वचषक सामन्यात (T-20 World Cup match) भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. याचा राग मनात धरुन आरोपीने काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर (Social Media) खेळाडूच्या मुलीवर बलात्काराची धमकी दिली होती. सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर (Dr. Rashmi karandikar) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. या सामन्यानंतर भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीलाही याला सोशल मिडीयावर अनेकांनी ट्रोल केलं होतं. त्यानंतर एका ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय संघाच्या खेळाडूच्या मुलीवर बलात्कार करण्याचं अक्षेपार्ह ट्विट करण्यात आलं होतं. त्याची मुंबईच्या सायबर पोलिसांनी दखल घेत तपास केला.

Arrest
आपल्याच पक्षातील सलमान खुर्शीद यांना आझादांनी पाडलं उघडं

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी रामनागेश अलीबथिनी याला हैदराबाद येथून अटक केली. लज्जास्पद पोस्ट करणारा हा आरोपी सुशिक्षित असून तो साँफ्ट वेअर इंजिनिअर आहे. याआधी तो फूड डिलिव्हरी अॅपसाठी सॉफ्टवेअरचे काम करत होता. दिल्ली महिला आयोगाने या घटनेची दखल घेत, ९ महिन्यांच्या मुलीला बलात्काराची धमकी देणं हे अतिशय लज्जास्पद असल्याचं म्हटलं होतं.

दिल्ली महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेत आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांना नोटीसही बजावली होती. त्यानुसार सायबर पोलिसांची तपासाची चक्रे फिरली आणि सायबर पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने हैद्राबादमधून अटक केली. आरोपीला न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com