मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर आणखी 25 वर्षे टोलवसुली

मुंबईत येताना लागणाऱ्या पाच प्रवेशद्वारांवर (एंट्री पॉईंट) आणखी 25 वर्षे तरी टोल द्यावाच लागेल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्पष्ट केले आहे.
मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर आणखी 25 वर्षे टोलवसुली

मुंबई : मुंबईत येताना लागणाऱ्या पाच प्रवेशद्वारांवर (एंट्री पॉईंट) आणखी 25 वर्षे तरी टोल द्यावाच लागेल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्पष्ट केले आहे. 

याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच जारी केली. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवासासाठी तर 2052 पर्यंत टोल भरावा लागणार आहे.

वाशी, ऐरोली, मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड लालबहादूर शास्त्री मार्ग आणि दहिसर या मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर सध्या सरासरी 55 रुपये पथकर भरावा लागतो. ही रक्कम 2020 नंतर 65 रुपये होईल. त्याशिवाय प्रत्येक तीन वर्षांनंतर टोलच्या रकमेत वाढ करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूवर 31 मार्च 2052 पर्यंत टोलवसुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या रस्त्याच्या उभारणीसाठी झालेला खर्च आणि कर्जावरील व्याजाची वसुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com